पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ३.
पैशासंबंधीं.

 इंग्लंडांत लोकांना काटकसरीचें महत्व कळत नाहीं असें मला वाटतें. आमचे देशबांधव अतिशय श्रम करितात, व पुष्कळ पैसा मिळवितात; परंतु इतर राष्ट्रें काटकसरीच्या कामांत आह्मांस मागें टाकितात. एक झातारा क्वेकर ह्मणे- “माझ्या मुला, तूं श्रीमंत किंवा गरीब होणार ह्याचा निर्णय तूं जें कांहीं कमावशील त्यावरून करितां येत नाहीं, तर जो कांहीं खर्च करिशील त्यावरून करितां येणार आहे.” “थ्रिफ्ट" हा शब्दच आपला अर्थ व्यक्त करितो. “थ्राईव्ह” ह्मणजे भरभराटीस येणें ह्या शब्दापासून त्याची व्युत्पत्ति झाली आहे.
 श्रीमंत होण्याचा प्रश्न एकीकडे ठेविला तरी देखील शिलकेस टाकणें हें शहाणपणाचें व योग्य काम आहे. त्यामुळे पुढील गर- जेच्या वेळची तजवीज होते. “गरीबी दरवाज्यांतून आंत आली कीं, प्रीति खिडकींतून भरारी मारून जाते, " ही ह्मण नीच- पणाची आहे. पण बायकापोरें ह्यांनीं अन्नान्न करावें, व कपड्या- लत्त्यांसाठीं, औषधपाण्यासाठीं, विश्रांतीसाठीं अथवा हवा- पालट करण्यासाठी रसताळत असावें, हे पाहून वाईट वाटतें; व जर आपण योग्य मेहनत केली असती, व अपायरहित असोत, पण जरूरीच्या नव्हेत अशा कांहीं सुखाच्या गोष्टींस फांटा दिला असता, तर त्यांना दुःखांतून व चिंतेंतून सोडवितां आलें असतें हा विचार मनाला दुःखकारक होतो. केवळ पैसा पुजून ठेवण्या- साठी खर्चात हात आंवरता धरणें हें नीचपणाचें कृत्य आहे.