पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४

ह्या गोष्टींकडे जितकें लक्ष्य द्यावें तेवढे थोडेंच. मनें आपल्याकडे ओढतात तीं ह्यांनींच. व विचार हे मनापासून उत्पन्न झालेल्या बुडबुड्याप्रमाणें होत.”
 वाग्देवता माणसास आयुष्यांत जेवढी मदत करते, तेवढीच सौंदर्यदेवता करिते. आवडत्याचें मसण गोड हें आपणांस मा- हीत आहे. ह्याचें कारण काय? तर एकास काम गोड रीतीनें करितां येतें. दुसरा तेंच वाईट रीतीनें करितो. मदन व कलाकौ- शल्याभिमानी देव मर्क्युरी ( त्वष्ट्रा ) ह्यांचें देखील रतीच्या मदतीशिवाय भागत नाहीं.