पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३


इतर गोष्टींतही तसलें वर्तन कराल असें अनुमान करणें जरी अगदीं बरोबर नाहीं, तरी केल्यास फारसें वावगे होणार नाहीं.
 समाजांत मिसळतांना ज्यांचें वर्तन गोड असतें त्यांचें अनु- करण करा. एक जुनी ह्मण असें सांगते- "वागणुकीवरून माणूस ओळखतां येतो.” “ह्यांत थोडीशी अतिशयोक्ति आहे, पण तथ्यही बरेंच आहे.” “मोहक चेहरा असणें हें सततचें वशिला- पत्रक होये.” सद्वर्तन प्रत्येकास महत्वाचें आहे, व कांहींजणांस तेंच आदिकर्तव्य होय. " आंगचे गुप्प व ज्ञान ह्यानेंच फक्त लोकांचीं मनें आकर्पून घेतां येत नाहींत, लोकांची मनें आपलीं करून घेतल्यावर तीं तशींच ठेवण्यास मात्र हीं फार उपयोगीं पडतात. आपल्या बोलण्याची ढब आणि अभिनय ह्यांनीं लो- कांचे नेत्र आपल्याकडे ओढून घ्या; लोकांचे कान आपल्या गोड व सुस्वर भाषणानें रिझवा; मग अंतःकरण खात्रीनें (माझ्या मतें बहुतकरून ) तुमचें होईल. " प्रत्येकाला कानाचा व डोळ्याचा उपयोग करितां येतो, पण चांगला समज थोड्यांनाच असतो. हें जग एक रंगभूमीच होय; व आपण सर्व पात्रे आहोत. नाटक चांगलें उतरणें, किंवा न उतरणें, पात्रांचें काम जसें वठेल त्यावर अवलंबून असतें, हें सर्वोस माहीत आहे.
 लॉर्ड चेस्टरफील्ड आपल्या मुलाविषयीं बोलतांना असें ह्मणतो - " जेथें जेथें त्याला लोक ओळखतात, तेथें तेथें तो स- वना आवडतो असें लोक मला सांगतात. मला हें ऐकून आ- नंद वाटतो. पण लोकांनी त्याला ओळखण्यापूर्वी तो लोकांस आवडूं लागला, व नंतर त्याच्यावर ते प्रीति करूं लागले तर बरें. x x x x ह्या गोष्टी फारशा महत्वाच्या नाहींत असें तुह्मांला वाटत असले, तर मनुष्यस्वभाव तुझांला थोडाच अवगत आहे.


१ बेकन. २ मिल्टन, ३ चेस्टरफील्ड.,