पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३१


हा अनियंत्रित फाजील बोलकेपणा आयुष्यांत अगणित दु:- खांला व त्रासांला कारणीभूत होतो. याच्या योगानें ज्या माणसा- बद्दल आपण गोष्टी करितों, त्याच्या मनांत रागाचा आविर्भाव होतो. इतर मंडळींत हा तंटेभांडण उपस्थित करितो, व बारीक सारीक त्रासांचीं व अपमर्दाचीं कलमें जीं एहवीं विसरून गेलीं असतीं, तीं विकोपास नेतो.
 डेमारातसबद्दल प्लुतार्क अशी एक गोष्ट सांगतो - एकदां सभे- मध्यें त्याला विचारिलें, तूं मूर्ख ह्मणून स्तब्ध बसला आहेस, कीं बोलतां येत नाहीं ह्मणून? त्यावर त्यानें उत्तर केलें - “मूर्खीचें तोंड कधी त्याच्या स्वाधीन नसतें.” सालोमन ह्मणतो- विचार केल्याशिवाय बोलणारा माणूस तुला माहीत आहे काय ? असल्या माणसापेक्षां एकाद्या मूर्खाची देखील सुधारण्याची आशा पुष्कळ असते.
 आह्मी काय ते शहाणे आहों असें दर्शविण्याचा यत्न करूं नका. आपण हलक्या प्रतीचे आहों असें कळल्यामुळे माणसाला जितकें वाईट वाटतें, तितकें दुसऱ्या थोड्याच गोष्टींनीं वाटतें.
 बोलतांना आपल्या मतांच्या खरेपणाबद्दल हेका धरून बसूं नका. तुमचें मत खरें आहे असें किती जरी तुह्मांला वाटत अ- सलें, तरी तें चुकीचें असेल. स्मरणशक्ति आपणांस फशी पाडते, व कधीं कधीं आपण भलतेंच ऐकतों व पाहतों. आपलीं मतें जरी आवडीचीं असली, तरी त्यांना सबळ आधार नसेल. आणखी तुमचें ह्मणणे बरोबर असले, तरी त्याबद्दल पूर्ण खात्री आहे असा हेका न धरल्यानें तुमचें नुकसान होत नाहीं.
 कामकाज करितांना देखील फाजील खात्री असूं देऊ नका. व आलेली संधि फुकट दवडूं नका. “पेला हातीं घेतला तरी तो तोंडाला लावण्यापूर्वी काय काय होईल. "