पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६

त्रास पडूं नये, (व विचार करणें बहुतेकांस कंटाळवाणें वाटतें ) ह्मणून लोक तुह्मी स्वतःची जी किंमत कराल ती खरी मानितात.

 स्वतःला शत्रु करून घेऊं नका; ह्यापेक्षां अधिक वाईट गोष्ट तुमच्या हातून होणार नाहीं. "मूर्खाला त्याच्या मूर्खत्वास योग्य असें उत्तर देऊं नका; नाहींतर तुझी देखील त्याच्यासारखेच व्हाल."

 नम्रपणानें उत्तर दिलें ह्मणजे राग शमतो, हें लक्ष्यांत ठेवा. पण रागाच्या उत्तरापेक्षां खोंचून बोलणें अधिक वाईट. लोकांनी शिव्या दिल्या किंवा एकादी दुखापत केली तरी खपते, पण त्यांनीं हिणविलेलें ज्यांस रुचत नाहीं अशीं दहांत नऊ माणसें सांपडतील. असलीं माणसें कोणत्याही दुःखाच्या गोष्टी बहुतेक वि- सरतील, पण आपला उपहास झाला ही गोष्ट विसरणार नाहींत.

 आपण फसलों असें कळण्यापेक्षां फसण्यांत अधिक आनंद वाटतो. बॅसिलावस नांवाचा एक अथेन्समधील माणूस वेडा झाला, व पिरसमध्ये असणारी जहाजें माझीं आहेत असें त्याला बाहूं लागलें; पण क्रितोनें जेव्हां त्याला बरें केलें, तेव्हां तूं मला सर्वस्वाला नागविलेंस असा तो अत्याक्रोश करूं लागला. लॉर्ड चेस्टरफील्ड ह्मणतो – “थट्टेमुळे एकादा मित्र गमावणें हें मूर्खत्व होय." पण माझ्या मतें, थट्टेवरून एकाद्या तिन्हाईत उदा- सीन माणसाचा शत्रु करणें हें मूर्खत्व कमी प्रतीचें नव्हे. लोक आपला अपमर्द करितात, आपणांस हंसतात, असें क्षुल्लक कारणावरून समजूं नका; अथवा बोझ स्ट्रॅटेजम नांवाच्या पुस्तकांतील स्क्रब पात्राप्रमाणें “ लोक खो खो हंसतात ह्मणून खरोखर ते मलाच हंसतात" असें मानूं नका. उलटपक्षी, लोक तुमची थट्टा करूं लागले, तर आपणांस त्यापासून मुळींच दुःख होत नाहींसें दाखवा. लोक तुमची थट्टा करूं लागले व त्या