पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७

थट्टेत तुह्मीही त्यांना मनापासून जाऊन मिळालांत, तर उलट तुह्मांला त्यापासून फायदा होईल. आपली थट्टा झाली असून थट्टेत मिसळून जो स्वतःच हंसतो, तो माणूस प्रत्येकास आब- तो; आणि तें बरोबर आहे. कारण त्यामुळे आपला स्वभाव मनमिळाऊ आहे व आपणांस समज आहे असें दिसतें. आपण स्वतःचीच थट्टा केली, तर लोक आपली थट्टा करण्याचें बंद करितात.
 स्वतःचीं मतें कबूल करण्याचें धैर्य अंगी असूं द्या. लोक तुह्मांस मधून मधून हंसतीलच हें तुह्मी समजून असलें पाहिजे. आणि त्या हंसण्यापासून कांहीं तोटा होत नाहीं. तुझी खरो- खर आहांत तसे बाहेर दिसलां, तर त्यांत उपहासास्पद कांहीं नाहीं. पण तुमच्या अंगीं जें नाहीं त्याचा आहे असा बळेंच आव घालणें ह्यटलें ह्मणजे बरेंच उपहासास्पद होय. नाहीं त्याच दुःखाच्या गोष्टी कल्पून लोक स्वतःला त्रास करून घेतात, संतापतात, व इतरांबरोबरची मैत्री गाळीत जातात.
 मोकळ्या मनानें वागा, पण अंतर खोल ठेवा. स्वतःविषयीं फारसें बोलूं नका, व स्वतःबद्दल बाता मारूं नका. स्वतःच्या वतीने किंवा स्वतःला उणेपण येईल अशा रीतीनें बोलूं नका. लोकांना स्वतांविषयीं जितकें वाटेल तितकें बोलूं द्या. ते स्वतः- बद्दल बोलतात याचें कारण त्यांना तसें करणें आवडतें हेंच . तुह्मी त्यांचें ह्मणणे ऐकून घ्याल, तर तुमच्याबद्दल त्यांचें सर्वस्वीं चांगलें मत होईल. एकाद्या माणसाला तुह्मी त्यास मूर्ख किंवा दगडोबा समजतां असें कळू देऊ नका. निदान तसें सांगणें तुमचें कर्तव्यकर्म नसलें तर सांगूं नका. जर तसें केलेंत, तर तुमच्या नांवानें दगड फोडण्याचा त्याला अधिकार आहे. तुमचें