पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५

येऊं लागला तर तुझांला जें पाहिजे तें मिळालें. हा पहिला गड सर झाला.

 चांगलें संभाषण करितां येणें ही एक कलाच आहे. ज्यांच्या जवळ सांगण्याजोगें पुष्कळ आहे, त्यांना संभाषण चांगलें करितां येतेंच असें नव्हे. तरी पण "डेकार्टीस किंवा सर ऐझॅक न्यूटन ह्यांच्यापेक्षां संभाषण करण्यांत जास्त तरबेज नाहींत असे पायदळावरील कप्तान थोडेच असतील, " हैं लार्ड चेस्टरफील्डचें बोलणें अतिशयोक्तीचें होय.

 चांगलें भाषण करितां येणें जितकें कठीण आहे, तितकेंच तें सावधानपणे ऐकून घेणें कठीण आहे असें मी ह्मणणार नाहीं. परंतु कांहीं झालें तरी तें सोपें नाहीं हें खरें; व बहुतेक तें पहिल्या एवढेच महत्वाचें आहे. सांगितलेली प्रत्येक गोष्ट टीकाकार किंवा न्यायाधीश ह्या नात्यानें तपासणीस लावून घेऊं नका. आपलें मत न देतां बोलणाऱ्याचा अंतर्गत भाव ओळखण्याचा यत्न करा. तुह्मी लोकांशी ममतेनें वागलां, किंवा त्यांच्याविषयीं कळकळ दाखविली तर लोक तुमची सल्ला वारंवार घेतील; व दुःखाच्या किंवा संकटाच्या वेळीं पुष्कळांस आपण मदत केली, व त्यांचें समाधान आपणांस करितां आलें ह्या विचारांपासून उत्पन्न होणारें सुख तुह्मांला मिळेल. लहान वयांत लोक आपल्याकडे लक्ष्य देतील अशी वेडगळ आशा बाळगूं नका. धीर धरा, ऐका, बारीक दृष्टीनें सर्व गोष्टींचें अवलोकन करा. प्रेक्षक मंडळीस खरा तमाशा दिसतो अशी एक ह्मण आहे. तद्वतच तुह्मांला फारसें कोणी विचारीत नसलें, ह्मणजे तुह्मांला सर्व गोष्टींकडे चांगलें लक्ष्य देतां येतें. अन्तर्धान पावण्यास साधनीभूत अशी एकादी टोपीच तुमच्याजवळ आहे असें ह्मटल्यास चालेल. विचार करण्याचा