पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३

उत्पन्न झाले आहेत. लोकांना खुष ठेवितां येणें हैं एक स्वतः- सिद्ध सुखच होय. तसें करण्याचा यत्न करा; त्यांत हिरमोड होणार नाहीं.

 नेहमीं सावधगिरीनें वागावें, व डोकें शांत ठेवावें. ज्याप्रमाणें मन कोंवळें असावें, त्याप्रमाणें डोकेंही शांत असावें. व्यवहारासंबंधीं बोलण्याचालण्यांत शांत स्वभावाचा व आत्मसंयमनाचा अमूल्य उपयोग होतो; व प्रसंगीं ह्या दोन्ही गुणांच्या योगानें संकटांतून व अडचणींतून आपणांस पार पडतां येतें.

 आपणांपेक्षां कमी योग्यतेच्या माणसांबरोबर गांठी पडल्या, तरी त्यांना तुच्छ मानण्याचा आपणांस अधिकार नाहीं. वंशपरंपरेनें आलेल्या मोठ्या मिळकतीबद्दल गर्व वाहण्यांत जसा अर्थ नाहीं, तसाच बुद्धिसामर्थ्याबद्दलही वाहण्यांत अर्थ नाहीं. त्या मिळकतीचा व बुद्धिसामर्थ्याचा योग्य उपयोग केला तरच त्यांत पुरुषार्थ आहे. पुष्कळ माणसें दिसतात त्यापेक्षां जास्त हुशार असतात. माणसांची परीक्षा करण्यापेक्षां पुस्तकांची परीक्षा करणें अधिक सोपें आहे. माणसांच्या स्वभावाची परीक्षा करण्यास डोळ्यांची जरूरी लागते. “जेव्हां डोळ्यांवरून माणसाचा उद्देश एक दिसतो, व बोलण्यावरून तिसराच वाटतो तेव्हां शहाणे लोक डोळ्यांनीं प्रदर्शित केलेल्या भाषेवर जास्त विश्वास ठेवितात.”

 अतिशय सख्याविषयींच्या वल्गनांवर फारसा विश्वास ठेऊ नका. प्रथमभेटीबरोबर पुरुष पुरुषांवर व स्त्रिया स्त्रियांवर प्रीति करावयास लागत नाहींत. बहुतेक, परका मनुष्य जर सलगी दाखवूं लागला व लघळपणा करूं लागला तर त्याच्या बोलण्या- वर विश्वास ठेऊ नका. कारण जरी त्याची लबाडी नसली तरी ब- हुतकरून तो आपल्या शक्तीपलीकडे करीनसें ह्मणतो, किंवा आपला


 १ एमर्सन.