पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५२


तील विचारतरंग मला त्रास देतात." आपल्यास वाटलें तर आपणांस स्वास्थ्य मिळेल, मिळालें नाहीं तर आपला अपराध होय. विश्रांति, सुरक्षितपणा, मनाचें स्वास्थ्य, चिंतेंतून सुटका, इत्यादि ह्या जगांत देखील देईन असें धर्मं आश्वासन देतो. स्वर्ग पुढें येणारा लांबचा देश नव्हे, स्वर्ग आपल्यांतच आहे.
 तुह्मी त्रासलांत, थकलांत तर - " जे तुह्मी, श्रम करितां, व चिंतेच्या ओझ्यानें लादलां आहांत, ते तुझी माझ्या ठिकाणीं या, ह्मणजे मी तुलांला शांति देईन." असें तुम्हांला सांगितलें नाहीं काय ? तुमचें मन अस्वस्थ होऊं देऊं नका. “तुझी ईश्वरावर विश्वास ठेवितां तसा माझ्यावर ठेवा.”
 संशयानें मन व्याकूळ होऊं देणें, ह्मणजे ईश्वरावरील विश्वा- साची कमतरता असणें होय.
 भीतीस खरें कारण नाहीं असें आपणांस शास्त्रांत सांगितलें आहे. “कारण, जरी मृत्यूच्या छायेच्या खिंडींतून चा- लतों तरी, मी संकटाला भिणार नाहीं. कारण तूं माझ्याबरो- बर आहेस, तुझी काठी माझें रक्षण करील.”त्याचप्रमा चिंतेचें कारण नाहीं – “आकाशांतील पक्षी पहा. ते पेरी नाहींत, ते कापणी करीत नाहींत, धान्य कोठारांत सांठ नाहींत, तरी आकाशांतील बाप त्यांना चारतो. तुह्मी त्यांच्या- पेक्षां श्रेष्ठ नाहीं काय ?मग खाण्याची काळजी को वाहतां ? कुरणांतील कमळें पहा;तीं कशीं वाढतात, तीं श्रम करीत नाहींत, तीं सूत कांतीत नाहींत आणि तरी मी असें ह्मणतों कीं, वैभवयुक्त सालोमन देखील त्यांच्या सारखा शृङ्गारलेला तर मग जें गवत आज आहे व उद्यां भट्टींत जातें, अशा गवताला ज़र देव पोषाख पुरवितो तर हे पाखंड्या, तो तुला कपडे नाहीं का देणार ? "