पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५३


 "खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पदार्थ मिळविण्याची इच्छा करूं नका;कारण जगांतील सर्व राष्ट्रं त्या वस्तू शोधितात; व तुह्मांला त्या गोष्टी पाहिजेत हें तुमच्या बापाला कळतें. पण तुह्मी देवाचें राज्य मिळविण्याचा यत्न करा, ह्मणजे ह्या सर्व गोष्टी पुरवणाप्रमाणे मिळतील."
 तोच धडा वारंवार ठसवून सांगितला आहे. तींच वचनें पुनः पुनः सांगितलीं आहेत. “जगांत स्वतः करितां भांडार जमवूं नका, ह्या ठिकाणीं वाळवी व गंज त्याचा नाश करितात, चोर तें लुटतात; पण स्वर्गात भांडार मिळवा. त्या ठिकाणीं चाळू व गंज नाश करीत नाहींत, तेथें चोर पेट्या फोडत लुटित नाहींत. कारण ज्या ठिकाणीं तुमचें भांडार असेल त्या ठिकाणीं तुमचें चित्त वेधेल.” आणखी “लक्ष्मी वाढू लागली तर तीवर तुझें चित्त लावू नकोस. वस्तुतः गरीबीपेक्षां श्री- मंती जास्त काळजीचें कारण होय. जे लक्ष्मीवर विश्वास ठेवितात त्यांना स्वर्गराज्यांत शिरणें किती कठीण पडतें !"
 पर्वतावरील सर्मनमध्यें ज्यांना स्वर्ग मिळेल असें सांगितलें आहे ते - दयालु, नम्र, शांतता करणारे, व मनाचे शुद्ध असे लोक होत.
 “ईश्वराला भिऊं नका, तो आपला बाप आहे, पूर्ण प्रीति भीतीस काढून टाकिते असें आपणांस सांगितलें आहे.
 ”आपणांस माणसास भिण्याची जरूर नाहीं. "मीं ईश्वरावर हवाला टाकिला आहे. मनुष्य काय दुखापत करील, त्याला मी भिणार नाहीं."
 कोणत्याही गोष्टीनें आपणांस इजा होणार नाहीं. "" जे ईश्वरावर प्रीति करितात त्यांच्यासाठीं सर्व गोष्टी बऱ्या होतात. " ह्या आयुष्यांतील संकटांच्या, चिंतेच्या, विपत्तीच्या वेळीं
 २२