पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५१


हृदयांत जीवंत पाण्याचा झरा असतो, फक्त त्यानें तो स्वच्छ ठेवावा.”
 "कांहीं भावना माणसांना दिलेल्या असतात त्या भावनांत ऐहिकपणापेक्षां दैविकपणा जास्त असतो'."
 सिसरो ह्मणतो तें खरें आहे – “चांगल्या माणसाशिवाय कोणाला सुख नाहीं, किंवा सर्व चांगलीं माणसें सुखी आहेत हें खरें असलें, तर तत्वज्ञानाशिवाय दुसरे कोणतें ज्ञान जास्त उन्नतीस आणण्याच्या योग्यतेचें आहे ? व सद्गुणाशिवाय जास्त दैविक काय आहे ?"
 माणसांच्या शक्तीच्या बाहेर त्यांची सत्वपरीक्षा होत नाहीं हैं अगदीं खरें आहे; मात्र तें आपणांस विश्वसनीय वाटत नाहीं. परंतु ईश्वर सत्यनिष्ठ आहे, मोहाचा प्रतिकार करण्याचें जितकें सामर्थ्य तुमच्या अंगीं असेल त्याच्या पलीकडे तुह्मांला तो मोह पडूं देणार नाहीं, व त्यांतून तुझीं सुटावें ह्मणून त्या मोहाबरो- बर त्यांतून सुटून जाण्याचा मार्गही दाखवून देईल.
 तरी पण माणूस इतका चंचलवृत्ति आहे कीं, आपणांस असें सांगितलें आहे:- “ आपल्या सत्वपरीक्षेचे प्रसंग येऊं नयेत अशी प्रार्थना करा. कारण, आत्मा परीक्षेस तयार असतो पण देह अशक्त आहे.”
 पूर्णतेकडे आपला रोख असला पाहिजे.ज्याप्रमाणें आका- शांतील बाप पूर्ण आहे त्याप्रमाणें तुह्मी व्हा. त्याबद्दलचें बक्षिससन्निध आहे व तें अपरिमित आहे.आपली बरीच संकटें

आपल्यांतच असतात. भ्रमामुळे माणूस त्रास करून घेतो. डॉनियलप्रमाणें आपल्याला ह्मणतां येईल - "माझ्या डोक्यां-


१ स्कॉट.