पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५०


 टामस ए केम्पीस ह्मणतो: “थोड्या पैशाकरितां मोठा प्रवास करण्याचें पत्करितात, परंतु अमरत्वाकरितां मनुष्य एक पाऊ- लही टाकण्यास धजत नाहीं.” इतर ठिकाणीं तो ह्मणतो- "लिहा, वाचा, शोक करा, स्तब्ध बसा, प्रार्थना करा, मोठ्या धैर्यानें व्य- त्यय सोसा, अमरत्व ह्या सर्वांच्या किंमतीचें आहे, फार तर काय ? तें ह्यापेक्षां जास्त त्रासाच्याही योग्यतेचें आहे." असें असून आपणाकडून किती थोडें काम पाहिजे असतें. "कारण, न्यायानें वागणें, दया आवडणें, व ईश्वराच्या संगतीनें नम्रपणें वागणें ह्याशिवाय आपणांकडून ईश्वराला काय हवें असतें?
 जरी आपणांपासून जास्त हवें असतें, आणखी जास्त स्वार्थत्याग हवा असता, ह्या जगांतल्या सर्व वस्तू टाकून देण्याची जरूर असती, तरी हें आयुष्य किती क्षणभंगुर आहे !
 “सूर्यामुळे ढगाची पडलेली छाया ज्याप्रमाणे उन्हाळ्यांत गवतावरून नाचते, त्याप्रमाणें ह्या जगांतल्या पिढ्या, हे देवा, तुझ्या दृष्टीने आहेत. व असंख्य वर्षांची मालिका एकामागून एक येऊ लागली ह्मणजे, उत्तम उत्तम माणसें, ज्यांच्याबद्दल जगाला अभिमान वाटतो, तीं फक्त प्रकाशाच्या कवड्याप्रमाणें चक्क करितात व नाहींशी होतात.”
 ईश्वराजवळ मागण्या योग्य रीतीनें केल्या पाहिजेत.
 "जणू काय तूं माझ्याजवळ आहेस ह्या बुद्धीनें मी वाग- ण्याचा यत्न करीन; व जो वर्तनक्रम मी पत्करीन तो तुझ्या प्रीत्यर्थ होये."

 “अशी वृत्ति असणें हेंच बक्षिस होय. कारण धर्मीत कबूल केलेली अभिवचनें परलोकाबद्दलचींच नसतात. प्रत्येकाच्या


१ ब्रायन्ट. २ थॉरो.