पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४९


बऱ्या व वाईट माणसांवर सूर्य प्रकाशावयास लावितो. न्यायी व अन्यायी लोकांस पाऊस देतो. जे तुमच्यावर प्रीति करितात त्यां- च्यावर प्रीति केल्यास काय फायदा होणार ? दस्तुरीवाले देखील T तसे करीत नाहींत काय ? जर तुझीं आपल्या भाऊबंदांसच रामराम केला तर जास्त काय केलेंत ? दस्तुरीवालेही तसें करीत नाहीं का? तर आकाशांतील बाप जसा पूर्ण आहे त्याप्रमाणें तुह्मी पूर्ण व्हा.
 त्रास, दुःख, चिंता, इत्यादि येतील असें तुह्मांला कळलें पा- हिजे. संकटाचा अभिमान वाटला पाहिजे. कारण संकटामुळे दम धरतां येतो, त्यामुळे अनुभव मिळतो, व अनुभवामुळें आशा उत्पन्न होते. “आजचीं संकटें आमच्या ठिकाणीं स्पष्ट होणाऱ्या भावी वैभवाबरोबर तुलना करण्याच्या योग्यतेचीं नाहींत असें आपणांस सांगितलें आहे. आणखी, “ जे ईश्वरावर प्रीति करितात त्यांच्यासाठीं त्यानें ज्या वस्तू तयार केल्या आहेत तशा डोळ्यांनी पाहिल्या नाहींत, कानांनी ऐकिल्या नाहींत किंवा को- णाच्या स्वमीं आल्या नाहींत."
 एपिक्टेटस ह्मणतो- “आपण ईश्वराची आज्ञा पाळीत आहोंत, चांगल्या शहाण्या माणसांचीं कृत्यें शब्दांनी व कर्मोनी करीत आहोंत या ज्ञानापासून उत्पन्न होणारा आनंद इतर आनंदाच्या जागी आणा." तरी असें असतांनाही धर्मासाठी लोक किती थोडा स्वार्थत्याग करितात ? लोक धर्माबद्दल भांडतात, वादविवाद करितात, एकमेकांना शिव्या देतात, शेजाऱ्या पाजा- ज्यांना त्रास देतात, त्यांना जिवंत जाळतात, धर्माच्या नांवानें युद्धे करितात, त्यासाठीं मरतात, सर्व कांहीं करितात; त्याप्रमाणें चालत मात्र नाहींत. त्याप्रमाणें चालण्याचा यत्न देखील थोडे लोक करितात.