पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४८


“मी नवीन आज्ञा देतों, तुह्मी परस्परांवर प्रेम ठेवा, ज्याप्रमाणे माझें तुमच्यावर आहे त्याप्रमाणें तुह्मी एकमेकांवर करा. त्याच- मुळें तुह्मी माझे शिष्य आहां असें जगाला कळेल."
 आणखी –“ ह्या गोष्टी मी तुह्मांला सांगितल्या त्या अशा- करितां कीं माझा आनंद तुमच्या ठायीं रहावा, व तुमचा आ-नंद पूर्ण व्हावा. ज्याप्रमाणें मी तुमच्यावर प्रीति करितों त्या- प्रमाणें तुह्मी एकमेकांवर करा हीच माझी आज्ञा. आपल्या मित्रां- करितां आपला प्राण देण्यास तयार व्हावें ह्यापेक्षां जास्त प्रेम नसेल. मी सांगतों तसें कराल तर तुझी माझे मित्र आहां. आज- पासून मी तुह्मांला माझे गुलाम ह्मणणार नाहीं, कारण गुलांमाला आपला धनी काय करितों हें कळत नसतें. परंतु मी तुह्माला माझे मित्र असें ह्यटलें आहे. कारण माझ्या बापाबद्दल जेवढ्या गोष्टी मीं ऐकल्या आहेत त्या मीं तुह्मांला सांगितल्या आहेत.”
 ख्रिस्ती धर्माचे आगमनाचा पुकारा पुढील तत्वांनी केला. “ देवाधिदेवाचा जयजयकार, ह्या जगांत शांतता, व एकमेकां- बद्दल प्रेमभाव.”
 येशू मोसेसच्या शुभवर्तमानाबरोबर आपलें शुभवर्तमान ताडून असें दाखवी कीं, आपलें शुभवर्तमान वारंवार क्षमा करा व प्रत्यक्ष शत्रूवर प्रेम ठेवा असें सांगतें.
 “तुह्मी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीति करा व शत्रूंचा द्वेष करा असें सांगितलेलें तुह्मीं ऐकिलें आहे; पण मी तुझांला सांगतों आपल्या शत्रूंवर प्रीति करा, जे तुह्मांला शाप देतात त्यांचें बरें इच्छा, जे तुमचा द्वेष करितात त्यांचें बरें करा. तुमचा तिट- कारा करितात त्यांच्यासाठीं प्रार्थना करा. कारण त्याच्या यो- गानें आकाशांतील बापाचीं तुह्मी खरी लेंकरें ठराल. कारण तो