पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४६


२४६जागून कांहीं फायदा होणार नाहीं. " तसेंच " प्रत्येक चांगली देणगी देवाकडून मिळते, व ज्ञानाचा अधिकारी जो ईश्वर त्याच्या- कडून येते, त्याला दुटप्पीपणा आवडत नाहीं, माघार घेण्याचा वाराही त्याला खपत नाहीं. "
 परलोकासाठीं इहलोकाचा त्याग करा असें ख्रिस्ती धर्म सांगत नाहीं. उलटपक्षीं, जें आपणांस आवडावें अशी आज्ञा झाली आहे त्यावर प्रेम ठेवण्यापासून, व ज्याची आशा धरावी त्याची आशा केल्यापासून, ह्या जगांतलें सुख साधून पुढच्या जगाचेंही सुख साधण्याजोगें आहे. व्यावहारिक ज्ञान व पारमा- र्थिक ज्ञान यांत खरा भेद नाहीं, कारण धर्मामुळे आयुष्य पवित्र होतें.
 “आपल्या सोयऱ्याधायऱ्यांना रामराम ठोकून व आपलें काम- काज आटोपून मठींत जाऊन रहाण्याची गरज नाहीं. क्षुल्लक वाट- णारी परिस्थिति, व माणसांचें नेहमींचें कर्तव्य ह्या दोन गोष्टी, जें आपणांस इच्छिण्याचा अधिकार आहे तें पुरवितात. त्यांत आत्मसंयमनास जागा असते. दर रोज ईश्वराच्या जवळजवळ जाऊन पोहचण्यास हा मार्ग आहे'.
 येशू आपल्या शिष्यांस ह्मणाला - " तूं माणसांना जगांतून सोडीव अशी प्रार्थना मी करीत नाहीं. तर त्यांना पापापासून दूर राख अशी प्रार्थना करितों. " प्लेटो, अॅरिस्टाटल, एपिक्टेटस, सेनिका, मार्कस आरिलिअस इत्यादींच्या ग्रन्थांतून उदात्त तत्वें आहेत. तरी पण नव्या करारांत जें प्रीतीचें तत्व सांगितलें आहे तें त्यांत नाहीं.

 माझा धर्म नवीन आहे असे येशू जें ह्मणाला तें खरें आहे :-


१ केबल.