पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४६


आपल्याबद्दल काळजी आहे काय ? व ह्या नीच प्राण्याबद्दल स्वर्गीच्या प्राण्यांच्या ठायीं प्रेम आहे काय ? "
 स्तोत्रकार ह्मणतो तें खरें आहे - "जेव्हां मी आकाशाबद्दल विचार करितों, तुझे हस्तकृत चन्द्र, सूर्य, व तारे, ह्यांच्या- बद्दल मनन करितों, तेव्हां माणूस तो काय, कीं त्याच्याबद्दल तूं इतकी काळजी करावीस, मानवपुत्र ते काय कीं त्यांना त्वां भेट द्यावीस असे प्रश्न मनांत येतात."
 पण कॉलेरिजच्या उत्तरानें बरेंच समाधान होतें - " माणसांनी धांचा केला तर संत मदत करितील. कारण निळे आकाश सर्वा- ना व्यापून आहे."
 आपणांला असे अभिवचन नाहीं का मिळालें:-
 "मदत मागा व दिली जाईल, ईश्वराला शोधा व तो मिळेल, स्वर्गद्वार ठोठावा व तें उघडेल. "
 व आणखी " जें माझ्या नांवें मागाल तें मी करीन. " " तुझी जर माझ्या ठायीं रहाल तर माझीं वचनें तुमच्यांत रहातील. तुमची इच्छा असेल तें मागा व तें तुह्मांला दिलें जाईल. " आपणांस असेंही सांगितलें आहे की “ सर्व हृदयें ईश्वराच्या दृष्टीस उघड आहेत व सर्व इच्छा त्याला कळतात. " व तो अनुतापी हृदयाचा अनुताप तुच्छ मानीत नाहीं, व दुःखी माणसांच्या इच्छा तुच्छ मानीत नाहीं. " त्याचप्रमाणें आपली चिंता देवाला वाहा, कारण तो तुझी काळजी करितो."
 स्वतःच्या हातून आळस झाला ह्मणून ईश्वर मदत करील असें मानूं नये. तरी आपणांस मदतीचें आश्वासन मिळाले आहे. इतकेंच नव्हे, तर असेंही सांगितलें आहे कीं, "ईश्वरानें घर बांधण्यास मदत केली नाहीं तर घर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ होतील, ईश्वरानें शहराचें रक्षण केलें नाहीं तर पाहारेकऱ्यांनी