पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४५


 तरी पण आपल्या हातून कितीका पाप झालेलें असेना, कोणी निराश होऊ नये अशा अर्थाचे अनेक उल्लेख व अभिव- चनें शास्त्रांत सांपडतात.
 ख्रिस्ती धर्म आशासंमूलक होय, भीतिसंमूलक नव्हे. रॅले सुचवितो त्याप्रमाणें आपल्या विचारांत मरण व शेवटचा न्याय, स्वर्ग व नरक ह्यांचें संमीलन असावें. “जो वारंवार विचार करितो त्याचें बरें झालेंच पाहिजे. "
 माणसांना हांकून नेण्यापेक्षां त्यांना हातीं धरून नेणें बरें. व नुसती वटवट करण्यापेक्षां उदाहरण घालून देणें बरें. ज्यांना इन्क्कीझिशनच्या भीतीची पर्वा नाहीं त्यांना ड्रमंडच्या ह्मणण्याची सत्यता वाटेल; तें ह्मणणें हें होयः-
 "दररोज ख्रिस्ताच्या सहवासांत दहा मिनिटें - निदान दाने मिनिटें तरी घालविलीं ( मग तो सहवास तादात्म्य होऊन व प्रत्यक्षाप्रत्यक्षी होऊन झाला पाहिजे) कीं, हें सर्व आयुष्य निराळेंच वाटायाला लागेल."
 बऱ्याविषयीं विचार करा ह्मणजे हातून वाईट घडायाचें नाहीं. "ज्या ज्या गोष्टी खऱ्या, प्रामाणिक, न्यायास अनुसरून, शुद्ध, रमणीय, चांगल्या लढल्या असतील, त्या करण्यांत सद्गुण व प्रशंसा असली तर त्याविषयीं मनन करीत असा. मनानें गुन्हे झाल्याशिवाय ते प्रत्यक्ष कृत्यरूपानें होत नाहींत.
 सेनिकानें टलें आहे- “जें माणसास कळू नये असें तुह्माला वाटतें तें ईश्वराजवळून मागूं नका. त्याचप्रमाणें जें ईश्वरास कळूं नयेसें वाटतें तें माणसाजवळून मागूं नका.” “परंतु अनादि काल व आकाश ह्यांच्या मानानें आपण किती क्षुद्र व क्षणभं- गुर प्राणी आहोंत हा विचार मनांत आला ह्मणजे स्पेन्सरप्रमाणें आह्मांला स्वतःला प्रश्न विचारावे लागतात - ईश्वराच्या ठायीं