पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४२


शांततायुक्त स्वर्ग होय. धर्म एका अर्थानें शरीर व आत्मा ह्या दोहोंसही अवश्य आहे. शरीर व आत्मा ह्या दोहोंसही योग्य मान दिला पाहिजे.
 फिच ह्मणतो तें खरें आहे :- " धर्म हा इतर व्यवहारापासून विभक्त असा निराळाच व्यवसाय नव्हे. ह्मणजे तो व्यवसाय इतर व्यवसायांपासून निराळा नेमक्या दिवशीं व नेमक्या तासास करावा असें नव्हे. आपले सर्व विचार व कृत्ये ह्यां व्यापून असणारी, त्यांस प्रोत्साहन देणारी ती एक अंतस्थ शक्ति- च होय.”
 बायबलमध्यें जाड्या व्याख्या देऊन आपल्याला घोटा- ळ्यांत पाडिलें नाहीं. अशा वितंडवादापासून आपणांस दूर केले आहे.
 मोसेस ह्मणतो- “ जी आज्ञा आज मी सांगतों ती तुझ्या- पासून चोरून ठेविली नाहीं, ती फारशी दूर नाहीं, ती स्वर्गात नाहीं. नाहीं तर तुह्मी ह्मणाल आह्मीं ती ऐकावी व ती पाळावी ह्मणून आह्मांसाठीं स्वर्गात कोण जाईल व ती घेऊन येईल ? * पण ती आज्ञा तुझ्या अगदी जवळ आहे. तूं ती पाळावीस ह्मणून तुझ्या तोंडांत, तुझ्या हृदयांत ती ठेविली आहे. "
 प्रश्न विचारणाऱ्या वकिलाला येशूनें उत्तर दिलें :- “अंत:- करणपूर्वक तुझा धनी जो ईश्वर त्याच्यावर प्रीति करा. ही पहिली व सर्वात मोठी आज्ञा. दुसरी तिच्यासारखीच आहे. स्वतः प्रमाणें आपल्या शेजाऱ्यावर प्रेम ठेवा. ह्या दोन आज्ञांवरून सर्व कायदेकानू व भविष्यवादी ओवाळून टाका. "
 जेम्स साधु ह्मणे " अनाथ पोरेबाळें व विधवा त्यांचें दुःखा- च्या वेळीं समाधान करणें, व ऐहिक वस्तूंपासून स्वतःला डाग