पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४३


लावून न घेतां रहाणें, हा शुद्ध धर्म होय. व आपला बाप देव त्याच्या दृष्टीनें अशुद्धतारहित हाच धर्म होय. "
 आपण आलों कोठून व जातों कोठें हैं आपणांस सांगतां येत नसेल; कशावर विश्वास ठेवावा व काय विचार करावा ह्याची खात्री नसेल; पण आपले कर्तव्यकर्म काय हें अन्तर्यामीं आपण जाणतों. आपल्या शेजान्यांसंबंधाचें आपलें कर्तव्य ईश्वरा- संबंधीं कर्तव्याचा एक भाग होय. मधल्या युगांतले दरवडेखोर मी ईश्वराचा मित्र पण माणसाचा शत्रु असें स्वतःविषयीं ह्मणत असत. ते ख्रिस्ती धर्माचें खरें ब्रीद अगदीं चुकत असत. त्याच- प्रमाणें ज्यांना तसल्या सबबी नाहींत ते लोक चुकतात. ईश्वरा- वरचें प्रेम माणसांवर प्रेम करण्यांतच चांगलें व्यक्त करितां येतें. "
 इतरांबद्दल कुरकुर करावीसें आपणांस कधीं कधीं वाटतें, तर त्या वेळीं, " आपली इच्छा असते त्याप्रमाणें आपणांला होतां येत नाहीं, मग दुसरे लोक अगदीं आपल्या मनासारखे होतील अशी आशा कां बाळगांवी ?" हें वचन लक्षांत ठेवा.
 जरी कुरकुर करण्यास योग्य जागा असली तरी ज्या अर्थी ईश्वर आपणांस क्षमा करील अशी आपणास आशा असते, त्या अर्थी आपणांस त्यास क्षमा केली पाहिजे. व ही क्षमा पीटर ह्मणतो त्याप्रमाणे “सातच वेळ करावयाची असें नव्हे तर ७४७७ इतके वेळा करावयाची. "
 सुखाच्या आशेपेक्षां दुःखाची भीति बऱ्याच माणसांच्या मना- वर जास्त पगडा बसविते. एव्हरशामच्या देवळांत एक जुना चमत्कारिक कबरलेख आहे तो याप्रमाणें होयः-

 मऊ बिछान्यावरून खळग्यांत जाऊन पडणें व खळग्यां-


१ टामस ए केस्पीस. २ सेंट मॅथ्यू.