पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४१


भरतें, किंवा अज्ञेय वादाच्या विचारांनी भंडावून जातें. प्रसंगानुसार ईश्वरानें सर्व वस्तु निर्माण केल्या व त्यांचा तो शास्ता आहे, तो सर्व पहातो व ऐकतो, व जे त्याची आज्ञा पाळतात व त्याच्यावर प्रीति करितात त्यांचें सर्व प्रकारें बरें करितो, इतकेंच त्यांना सांगावें. अशा ईश्वराबद्दल माहिती कळली, तर त्याच्या विषयींचे विचार साहजिक उत्पन्न होतील; त्यांमध्यें कांहीं चुकीचे दिसून आल्यास ते तुह्मी शुद्ध करा. जो परमात्मा अज्ञेय आहे असें प्रत्येकाला कबूल केलें पाहिजे, त्याच्या बद्दलच्या कल्पनां- विषयीं अतिशय चौकस न होतां वर सांगितलेल्याच कल्पनांनी समाधान करून घेतलें तर ठीक होईल. कारण अतिशय चौक- सपणामुळे, ज्यांना विचारमहती नाहीं, व ज्ञेय कोणतें व अज्ञेय कोणतें ह्याचें तारतम्य ज्यांना नाहीं, ते देवभोळेपणांत पडतात अथवा पाखंडी बनतात. ते देवाला आपल्या सारखा बनवितात, अथवा दुसरें कांहीं कळत नाहीं ह्मणून तो मुळींच मानीत नाहींत."
 जानसनचें एक वचन लॉवेल विशेष प्रशंसाबुद्धीनें उत्तर- वीत असे – “ज्याच्यामुळे इंद्रियांच्या सत्तेतून आपण मुक्त होतों, ज्याच्या योगानें गतकाल किंवा भावी काल हा सध्यांपेक्षां जास्त महत्वाचा भासतो त्याच्या योगानें विचारी प्राणी ह्या ना- त्यानें असणारी आपली महती वाढते. "
 ज्ञानकांड व कर्मकांड हे धर्माचे शास्त्रदृष्ट्या विभाग होत. पण त्यांच्यावर धर्माचें अस्तित्व नाहीं. नेहमींच्या व्यवहारांत धर्म हा आचार घालून देणारा आहे. तो भरभराटीच्या वेळी संर- क्षक, विपत्तीच्या वेळीं समाधानकर्ता, चिंतेच्या वेळीं आश्रयस्तंभ, संकटाच्या वेळीं आसऱ्याची जागा, दुःखाच्या वेळीं सुखदाता,
 २१