पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग १९.
धर्म.


 ईश्वरी मीमांसेंत प्रतिपादित केलेला धर्म विद्वान् माणसांना देखील गूढ वाटतो. तरी कर्तव्यकर्मरूपी जो धर्म तो एखाद्या अजाणत्या पोरासही स्पष्ट कळतो.
 जेरेमी टेलर ह्मणतो- " कर्तव्यकर्माची दिशा अपोलोच्या कौलाप्रमाणें द्यर्थक नाहीं. कर्तव्यकर्मे कठीण भाषेंत प्रतिपादित केलेली नाहींत, त्यांचा अर्थ गूढ नाहीं. त्यांनी सांगितलेले उपाय फसविणारे नाहींत, व एक होईलसें वाटून परिणामी उलट होणारे नाहींत. कर्तव्यकर्मात व्यक्त झालेली देवाची वाणी आकाशाप्रमाणे उघड आहे, चन्द्राप्रमाणें स्पष्ट आहे, सूर्याच्या संस्काराप्रमाणें मानसिक आरोग्य राखणारी आहे; निदान हैं तरी खरें आहे कीं, जेव्हां एकादी गोष्टी अव्यक्त वाटू लागते, तेव्हां सावधगिरीनें शोध करणें भाग पडते; तरी त्यामुळे अ- न्याय केला असें ठरत नाहीं, जेवढा त्यांचा अर्थ स्पष्ट व्हावा व होतो तितकीच जबाबदारी आपल्यावर असते.”
 लॉक जें मुलांबद्दल ह्मणतो तेंच बऱ्याच मोठ्या माणसांस लागू पडतेंः-- "त्यांच्यांत ईशाबद्दल प्रीति व पूज्य बुद्धि ठसवून द्या, व हें आरंभीं पुरे आहे. त्याबद्दल जास्त समजूत घालण्याची जरूरी नाहीं. कारण तसें करण्यांत एक धोका आहे. भूतादिकां - बद्दल अगदीं लहाणपणीं त्यांच्याबरोबर बोलून, व त्या अनादि परमात्म्याची अज्ञेय प्रकृति त्याला समजावून सांगण्याचा अवेळी यत्न करून, त्याचें डोकें त्यांच्या बद्दलच्या खोट्या नाट्या विचारांनी