पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३८


कमी योग्यतेचें आहे अशा शरीरावर शहाणपणें दाब ठेवितो, त्याला प्रेमाने वळण लावतो, त्याचा फायदा होईल अशा रीतीनें त्याची काळजी घेतो, त्याला पुरेल असें अन्न देतो, व दयार्द्रबुद्धीनें त्याला वागवितो, त्या वेळीं आत्मा व शरीर मिळून पूर्ण माणूस होतो. पण जर शरीर राजा बनले व त्यानें वासनांच्या मस्तपणामुळे विचारशक्तीचा -हास करून इच्छा व आवडनिवड ह्यांच्यावर दाब ठेवला, तर शरीर व आत्मा ह्यांची सांगड चांगली नाहीं. व असा मनुष्य मूर्ख व दुःखी होय. जर आत्मा राजा नाहीं तर तो योग्य मित्र नव्हे. एक तर तो शास्ता होईल नाहीं तर बन्दा गुलाम बनेल.
 जर ह्या जगांत सुख झालें नाहीं तर तो आपला अपराध होय. रस्किन ह्मणतो — “सर्वांना सुख होईल, सर्वांच्या हातून मोठें काम होणार नाहीं. "
 मन स्वस्थ व सुखी राखण्यास तें शहाणपणाच्या उदात्त त्रि- चारांनीं भरून ठेविलें पाहिजे. फीड्स नांवाच्या पुस्तकांत लेटो ह्मणतो –“ईश्वरत्व ह्मणजे सौंदर्य, चांगुलपणा, इत्यादींत असतें, त्यांच्या योगानें आत्म्यांच्या पंखांना जोर येतो, व तीं वाढतात; पण वाईट गोष्टीवर जर आत्म्याचे पोषण झालें, तर त्याचीं पंखें खुंटतात व तीं निकामी होतात.

 तर मग हेतूची निवड चांगली करा. “व आनन्ददेवी घरी आणा. आपल्या मोठ्या हृदयांत तिच्यासाठीं जागा तयार करा. तिला वाढण्यास अवकाश ठेवा. तिच्यावर प्रेम करा, मग ती तुमच्याकरितां सुरस गायन करील. तुझी शेतांतून काम करीत


१ जेरेमी टेलर.