पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३७


मिळतें तेव्हां व त्याची आठवण झाली ह्मणजे, ह्यांत संशय नाहीं. पुढे सुख मिळेल ही आशा शुद्ध आनंदाच्या उत्पत्तीची जागा होय. ज्यांच्यावर आपलें प्रेम होतें व ज्यांचा आपला वियोग झाला, त्यांना भेटण्याची आशा, जें आतां आपणांस कळत नाहीं तें कळण्याची आशा इत्यादि गोष्टींमध्यें अस्सल सुख असेल; समाधान व आनंद ह्यांचा हा झरा होय, त्याविरुद्ध मला बोलावयाचें नाहीं. परंतु ह्या जगांतल्या सुखांची किंमत कमी मानतां कामा नये,अथवा त्यांबद्दल कृतघ्नहोतां कामा नये.तर स्वतःवर इतका दाब ठेवा की केवल कवीप्रमाणें तुह्मांला ह्मणतां येईल - " माझ्या धन्या—माझ्या देवा. तुझ्या शुद्ध इच्छेप्रमाणें कर. मी स्वस्थ बसतों. मी मुळींच हालचाल करीत नाहीं, कां कीं आधारभूत झालेला तुझा हात सुटेल, व माझ्या बापाच्या अंगाशीं अगदीं शांततेनें चिकटून एका प्रकारच्या मोहनीमुळे मी जो ब्रह्मानंदांत आहें तो नाहींसा होईल."
 व अशाच रीतीनें अचल सृष्ट पदार्थापासून तुझांला सुख होईल; ह्मणजे "तारकगणांनीं अंकित झालेल्या आकाशांतील शांतता, व ह्या एकांत टेंकड्यांतील निद्रामय स्वास्थ्यै” ह्यांपासून.
 ह्या रीतीनें स्वस्थचित्त झाल्यावर ज्याप्रमाणें पुरातन काळी मामरच्या मैदानांत देवदूत एब्राहामाजवळ आले, त्याप्रमाणें तुमच्या घरांत ते तुमच्या जवळ येतील.
 “आणखी, माणसास अपरिचित अशा आनन्दजनक गोष्टी अनेक आहेत. व त्या सुधारणेच्या प्रसाराबरोबर त्याला कळू लागेतील. " हें संभवनीय आहे.

 “कारण ज्या वेळीं आत्मा, ज्या शरीराशी सांगड झाली असूनही


१ वर्डस्वर्थ. २ मॉडेगाझा. आयडिअल्स आफू लाईफ.