पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३६


 सेंट थॉमस ए कैंपिस ह्मणे - " वासना तोडा ह्मणजे तुह्मांला शांतता मिळेल. मोठ्या गोष्टींनीं आपणांस जितका त्रास होतो तितकाच बारीकसारीक गोष्टींनीं ह्या जगांत होतो."
 “माणसांस शाप ह्मणून ज्या वाईट गोष्टी मिळाल्या आहेत त्यांत सर्वांत वाईट ह्मणजे त्यांचा वाईट स्वभाव होये.
सुख आपल्या बाहेर शोधूं नये. सुख स्वतःच्या ठायीं ह्मणजे मनांत शोधावें. ईश्वरी राज्य आपल्या शरीरांत आहे. आपणांस जर येथें सुखी रहातां येत नाहीं, तर पुढे आपण सुखी होऊं अशी आशा करणें व्यर्थ आहे. सध्यां देव आपली जेवढी काळजी घेतो त्यापेक्षां जास्त नंतर घेईल काय ? ह्या जगांत आपण शांतता मिळवून घेत नाहीं तर ती आपणास स्वर्गात मि- ळेल अशी आशा कशी करावी ? ती कशामुळे मिळत नाहीं ? गर्व, लोभ व महत्वाकांक्षा ह्यामुळे; ह्यासारख्या इतर गोष्टी जर नसत्या तर आपणांस येथें सुख मिळालें असतें. ह्या जवळ असतांना आपणांस कोठें सुख होणार नाहीं. आपणांस जें मह- त्याचें वाटतें तें हरवेल ह्मणून जर ह्या जगांत आपणांस चिंता लागते, तर स्वर्गात आपणांस किती तीव्र काळजी लागेल ? ह्या जगांत इतरांशीं सलोख्याने रहाववत नाहीं तर इतरत्र तसें रहा- ण्याची काय आशा आहे ?
 स्वास्थ्य व सुख हीं बाह्य वस्तूंवर अवलंबून आहेत व फक्त दुसऱ्या जगांत तीं मिळतील असें आपण मानिलें, तर दुसऱ्या जगांत तिसऱ्या जगाकडे आपले लक्ष्य नाहीं का लागणार ? व ही सतत परंपरा नाहीं का होणार ?

 सुख हैं तीन रीतींनीं आनन्दकारक वाटते; पुढे मिळेल ह्मणून,


१ कंबर्लन्ड.