पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३४


मोकळ्या मनाचे विचार हेंच त्याचें कवच व साधें कृत्य हीच त्याची करामते.”
 आपणांला फुरसत फार थोडी मिळते हें ह्या युगाचें दुर्दैव. आपण सतत चक्रांत सांपडलों आहोंत. “माझें लहानसें शरीर ह्या अफाट जगाला त्रासलें" असें पोर्शियाप्रमाणे किती बायकांना व पुरुषांना वाटतें !
 चांगलें काम घाईनें होत नाहीं. विचारास वेळ आणि शांतता पाहिजे.
 किंगस्ले म्हणतो :- “आपणांस ज्याची जरूरी आहे ती अंतस्थ शांतता होय, हे मला माहीत आहे. आपल्या डोक्यास, आपल्या हृदयास विश्रांति पाहिजे.शांत, स्थिर, स्वतःशींच समाधान पावणारी व आत्मसंयमी अशी वृत्ति पाहिजे. अशा वृत्तीला उद्दीपन नको; कारण, तिला ग्ला- नीचा पटका नसतो. तिला मंद करणारें औषध नको, कारण ती चैवत नाहीं. तिला साधूंचे यमनियमादि नकोत, कारण ईश्वरी देणग्यांचा दुरुपयोग न करितां सदुपयोगच करण्यापुर्ते सामर्थ्य तिच्या अंगी असतें. ती वृत्ति खरी मर्यादित आहे, म्हणजे खाण्यापिण्यांतच नव्हे, तर वासना, विचार, कृत्यें इत्यादींत मर्यादित आहे; त्या वृत्तीला अमर्यादित काम- विकार किंवा महत्वाकांक्षा ह्यांचें वारें नाहीं; त्यांच्या पाशांत ह्मातारा अॅडम सांपडला, व त्यांमुळे निषिद्ध मार्गांनी ज्ञानप्रकाश व आयुष्य मिळविण्याचा यत्न त्यानें केला,

व रोग व मृत्यु ह्यांच्या आधीन झाला. होय हे मला माहीत आहे; व जर ती वृत्ति सांपडली, ह्मणजे खरी शांतता सांपडते असेंही मला माहीत आहे."


१ वॉटन.