पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३३


भोगावें लागतें तर तें आपल्या अपराधांकरितां, अथवा साधारण फायद्याकरितां. सेनीका ह्मणतो:-
 “जें कर्तव्य बजाविलें असतां तुह्मांस जास्त सुख होणार नाहीं असें कर्तव्यच नाहीं; अथवा जिला उपाय नाहीं अशी मोहाची गोष्टच नाहीं."
 सिसरोच्या मतांवरून एपीक्यूरसनें असें ठरवून ठेविलें होतें कीं, "वासना तीन तऱ्हेच्या असतात. १ स्वाभाविक व जरूरीच्या, २ स्वाभाविक असून जरूरीच्या नाहींत, ३ स्वाभाविकही नाहींत व जरूरीच्याही नाहींत. ह्या सर्व वासना अशा असतात. जरूरीच्या आहेत त्या फारसे श्रम न पडतां व खर्च न होतां तृप्त होतात. स्वाभाविक असून जरूरीच्या नाहींत त्यांना देखिल फारसें लागत नाहीं. त्या वासना पुरविण्यास जी संपत्ति पाहिजे ती संपत्ति सहज मिळण्याजोगी व पुरेशी सृष्टि उत्पन्न करिते. वायफळ वासनांविषयीं ह्मणाल तर त्यांना मर्यादा नाहीं व त्यांत मितव्ययही रहावयाचा नाहीं."
 हें आयुष्य पूर्णपणें सुखांत घालवितां यावें ह्मणून आत्म- संयमन करण्यास तयार झालें पाहिजे व बाह्यात्कारीं चांगलीं दिसणारी सुखें गाळली पाहिजेत.
 मनोविकारांच्या आधीन झाल्यापासून जो आनंद होतो त्या- पेक्षां आत्मसंयमापासून जास्त होतो. इंद्रियांच्या ठिकाणीं जरी खरा आनंद देण्याचें असतें, तरी त्यांच्या आधीन झालें असतां ज्याप्रमाणें पुरातन काळच्या नागकन्या खलाशांना खडकावर नेऊन घालित, त्याप्रमाणें इंद्रियें आपणांस आयुष्यांतील भोंवत व खडकांत घालतील.
 "ज्याला दुसऱ्याच्या मर्जीप्रमाणें चालावें लागत नाहीं, तो सुखी जन्मास आला, व त्याला चांगलें शिक्षण मिळालें. त्याचे