पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७

होकायंत्रानें दर्शविलेल्या इतर दिशा गलबतास ज्या बंदरास जावयाचें असेल त्याहून भलतीकडे नेतात. हें सर्व खरें. पण खरा रस्ता ह्मणजे फार बिकट असतो, व इतर रस्त्यांपेक्षां त्यांत जास्त संकटे येतात, असें ह्यावरून निघत नाहीं.

 वाईट व मूर्खपणाचें वर्तन अनेक वेळां मजेदार वाटतें व कधीं कधीं त्यापासून सुखही होतें, हें खोटें ह्मणतां येत नाहीं. च तसें ह्मणणेंही चुकीचें होईल. तें, ह्या जगांत मोह ह्मणजे नाहीं, असें ह्मणण्यासारखें होय. मला इतकेंच दाखवावयाचें आहे कीं, असल्या मोहपाशांत पडून जें क्षणिक सुख आपण मिळवितों, तें पुढील दुःखाचा मोबदला ह्मणून होय. सारासार विचार केल्यावर जो फायदा कःपदार्थाप्रमाणें वाटेल, असल्या फायद्याकरितां खऱ्या फायद्याच्या गोष्टींस आपण आंचवितों. इसोनें ज्याप्रमाणें आपली वडिलोपार्जित संपत्ति कांजीच्या पेल्याकरितां विकली, त्याप्रमाणें आपण करितों. सध्यां मी ह्या जगाबद्दल विचार करीत आहे, तेव्हां ह्या जगांत सुख मिळावेंसें वाटत असल्यास, आपलें आचरण शुद्ध असलें पाहिजे असें लें तर अतिशयोक्ति केल्याप्रमाणें होणार नाहीं. मनोविकारांस वश झाल्यामुळें जें सुख मिळतें, त्यापेक्षां जास्त सुख आत्मसंयमनामुळे मिळतें.

 संपत्ति व सुख एका ठिकाणी असतात असें नव्हे. ज्यांच्या योगानें ह्मणून सुख व्हावेंसें वाटतें, अशा सर्व गोष्टी अनुकूल असतांनाही दुःखी असलेलीं माणसें पुष्कळ आहेत. “ दैव आपणांस पुष्कळ देतें, पण तें दिलेलें पुरेसें वाटण्यास मनाची शांति पाहिजे.” “माझें मन मला सार्वभौम राष्ट्राच्या किंमतीचें वाटतें, कारण त्यापासून मला प्रत्यक्ष भासणारें सुख मिळतें.”


 १ बॉईल. २ डायर.