पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२८


तेस आणितो त्याप्रमाणें आनंदी स्वभाव स्वातंत्र्याच्या भावनेस व जीवित्वास पुष्टि आणितो, व आपणांत चांगुलपणाचीं जीं बीजें असतील व जें चांगलें ह्मणून असेल तें वाढीस आणितो.
 आनंदी स्वभाव असणें हें इतरांस उद्देशून आपले कर्तव्यच होय. ज्या ठिकाणीं इंद्रधनुष्याचें टोंक पृथ्वीस स्पर्श करितें त्या ठिकाणीं सुवर्णाचा पेला सांपडतो अशी एक जुनी समजूत आहे. त्याप्रमाणेंच कांहीं माणसें अशीं असतात कीं, त्यांचें हास्य, त्यांच्या बोलण्याचा नाद, त्यांचें सांनिध्य हीं सर्व सूर्यकिरणा- प्रमाणें, ज्यांना स्पर्श करितात त्यांना सुवर्णमय करून टाकितात. जोंपर्यंत माणसास आनंदवृत्ति ठेवितां येते तोंपर्यंत माणूस हताश होत नाहीं. आनंदी हृदय हें त्या माणसांस व त्याचप्रमाणें इतरांसही एकाद्या मेजवानीसारखें वाटतें. फ्लॉरेन्स नायटिंगे- लच्या नुसत्या वायानें माणसें बरीं झालीं; तितकीं तिच्या औष- धानें झाली नाहीत; व आपण इतरांच्या दुःखभारास हात ला- विला तर आपला दुःखभार हलका वाटतो.
 आनंदी वृत्ति ह्मणजे विचारशून्यता असें मानिलेलें दिसतें. परंतु त्यांच्यांत कांहीं संबंध दिसत नाहीं. आर्नल्ड ह्मणतो- "आनंदी वृत्ति ही ह्या जगांतली एक मोठी देणगी होय. गंभीर विचार आणि अति कोमल प्रीति, ह्यांच्या सहवासांत ती वारंवार आढळते; व ईश्वरदृष्ट्या जो मूर्ख त्याची कठीण हृदयता व निर्बुद्धता ह्यांच्या सहवासापेक्षां पहिल्या सहवासांत ती जास्त शोभते.”
 ज्यांचा जन्म ह्मणजे सक्त मजुरीची शिक्षा असे पुष्कळ लोक असतात. पण हें फक्त गरीब लोकांस लागून नाहीं, श्रीमंत लोक सुद्धां आतां अतिशय मेहनत करितात, तशांत