पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२९


ज्यांना आपला पैसा दुःखकारक वाटतो, असे लोक किती आहेत. त्यांच्या आयुष्यक्रमांत विश्रांति, शांतता व स्वास्थ्य मुळींच नसतें. ह्या जगांत दुःख टाळतां येत नाहीं, पण वाटल्यास तें सा करितां येतें. असें करण्यास आपल्या स्मरणशक्तिरूपी भिंतीवर सुंदर गोष्टींची चित्रे व आल्हादकारक आठवणी टांगून ठेविल्या पाहिजेत. सर्वांना सुख भोगावेसें वाटतें पण सुखी कसें व्हावें हें थोड्याच लोकांना कळतें; त्यांना ह्या देहाच्या महतीची व सौ- ख्याची सानुभूति होत नाहीं.
 लहान सहान संकटांचा बडिजाव वाढवून तीं असह्य प्रसंगां- समान मानूं नका. सिसरो ह्मणतो – “ज्यानें अनंत व अपार विश्वाबद्दल विचार केला आहे त्याला ह्या जगांतील कोणतें संकट मोठें वाटेल ? कारण ह्या टिचभर आयुष्यांत व मानवी ज्ञा- नाच्या बटवत शहाण्या माणसाला कोणती गोष्ट मोठी वाटेल ? शहाण्या माणसाचें मन नेहमीं इतकें सावध असतें कीं, कोणती गोष्ट त्याला आकस्मिक वाटत नाहीं."
 कोठें सालटी निघण्यापुरती जखम झाली कीं, प्राणघातक जखम झाली असें वारंवार वाटतें.
 फुलर ह्मणतो- “ लहानशी जखम बरी करण्यास एका वैद्याला बोलाविलें, त्यानें पलास्टर आणण्यास एकाला घाईनें पाठविलें. तेव्हां तो गृहस्थ ह्मणाला - काय जखम इतकी असाध्य आहे ? वैद्यानें उत्तर केलें नाहीं पण जरी जासूद हळूहळू आला तरी तितक्या वेळांत ती आपोआप बरी होईल.” काल हा जखमा या करितो त्याचप्रमाणें दुःखें नाहींशीं करितो.
 "संस्कृत मनाला, मग तें तत्ववेत्याचेंच असावें असें माझें मत नाहीं, परंतु ज्या मनापुढें ज्ञानाचें भांडार उघडें झालें आहे ज्याला आपल्या शक्तींचा उपयोग करण्याचें साधारणपणें शिक्षण
 २०