पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२७


पडूं नका, पण करमणूक करून घेण्यास नेहमीं तयार असा. "  आपले आयुष्य सुखांची एक मालिका करणें हें मोठें काम होय. मग तीं सुखें बारीकसारीक का होईनात ?
 उदाहरणार्थ विनोद करण्याची शक्ति ही मनुष्यमात्रांत मात्र सांपडणारी ईश्वरी देणगी होय. प्राण्यांना विचारशक्ति आहे किंवा नाहीं ह्याबद्दल संशय आहे; पण त्यांच्या अंगीं हास्यरस नाहीं हें बहुतेक स्पष्ट दिसतें. चाम्फर्ट हाणतो- “ज्या दिवशीं आपण मुळींच हांसलों नाहीं तो दिवस अगदीं फुकट गेला.” आ- नंदसूचक हास्य ऐकणे किती गोड वाटतें ! त्याच्यामुळे सर्वत्र आनंदच आनंद कसा होतो !
 “आनंदी माणसाला, सर्व दिवस जातो. दुःखी प्राण्याला तास कंटाळवाणा वाटतो.”
 आपला एक बिशप बोलतो - "आनंदी स्वभाव असला ह्मणजे क्रिश्चन धर्म साधला.” व तुझांला राग आलाच तर राग असतांना दिवस मावळू देऊ नका. भांडणांस दोन पक्ष लागतात; तुह्मी एक पक्ष होऊ नका. कांहीं लोकांची नेहमीं पिरपिर असते. ते स्वर्गात जन्मले असते तरी त्यांस कुरकुर करण्यास बरेंच सांपडलें असतें. इतर कांहीं लोक कोठें गेले तरी सुखी असतात. त्यांना सर्वत्र देवाचे उपकार व सृष्टिसौंदर्य दिसतें.
 "जर भीति पृथ्वींत गडप झाली असती, व आशा व्यर्थ झाल्या नसत्या, अथवा प्रीति नष्ट झाली नसती तर हीच पृथ्वी कशी स्वर्गमय वाटली असती."

 आनंदी स्वभाव हा नीतिमत्तेला पौष्टिक औषधासारखा आहे. ज्याप्रमाणें सूर्यप्रकाश फुलें उफलावयास लावितो, व फळें पक्क-


१ शेक्सपीयर. २ मॉरीस ऐहिक स्वर्ग. II १२२