पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग १८.


शांतता व सुख.


 भरभराट आणि सुख हीं एका ठिकाणीं नेहमीं सांपडतात असें नव्हे. बाह्यात्कारीं सुखी होण्यास सर्व गोष्टींची अनुकूलता असून पुष्कळ लोक दुःखी असतात. आवडत्या बलवत्तमास सृष्टि हात असेल तें सर्व देवो, पण तिच्यानें त्याला सुखी करवत नाहीं. सुखी होण्याचें काम त्यानें स्वतः केलें पाहिजे. ऐहिक गो- ष्टींत यश मिळविण्यांत घालविलेला आयुष्यक्रम संकटें व चिंता ह्यांनीं भरलेला असतो. सुख मिळवून घेण्याचा गुण अंगीं नसला, तर सृष्टिसौंदर्य, तिचें नानाविधत्व, ऐहिक सुखें, व मन गुंत- विणाऱ्या गोष्टी ह्यांमुळें तें त्याला मिळणार नाहीं. शॉपेनहॉर ह्मणतो – “एका माणसाला हें जग ओसाड, निरस आणि वर- वरलें वाटतें, दुसऱ्याला तेंच मनुष्यांस रहाण्यास योग्य, मन रंजविणारें व अर्थयुक्त भासतें. " सारंगी वाजविण्याचा अभ्यास करावा लागतो त्याप्रमाणें सुख करून घेण्याचा अभ्यास करावा लागतो. योग्य साधनें मिळविलीं तर सुख मिळतें. पण, तें तावून सुलाखून पाहण्यांत अर्थ नाहीं. "जर ऑर्फिअसप्रमाणें मागें वळून बारकाईनें पाहिलें तर सर्व उत्तम सुखें मृत्यु सुचविताते.”

 “सुख मिळविण्याचा यत्न करा ह्मणजे तें तुह्मांस मिळेले. " स्वतःलाच मोठा समजूं नका. जगांत तुह्मीच एकटे नाहीं. रस्किन ह्मणतो- “करमणुकीच्या गोष्टी शोधण्याच्या खटपटीत


१ डॅलास. २ फ्रँकलीन.