पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२५

 "त्याचा आयुष्यक्रम शांततेंत गेला. आणि स्वभावाच्या निरनिराळे प्रकृतींचें असें एकीकरण झालें होतें कीं, हा खरा माणूस" असें सृष्टीला उमें राहून सर्व जगाला सांगतां आलें असतें. आणि जर तुझी स्त्री असलांत तर तुमच्या विषयीं असें ह्मणतां येईल-
 “ती खरी स्त्री होती. तिच्या स्वभावाचे घटकावयव योग्य रीतीनें रचिले होते; ह्मणजे, तिला वेळ पडल्यास इशारत दे- ण्याचें, वेळ पडल्यास समाधान करण्याचें, व प्रसंगीं हुकूम बजा- वण्याचें कळत होतें. इतकें असून तिचा स्वभाव शांत व आ- नंदी होता व त्यांत दैविक स्वभावाची झांक होती.
 सर वाल्टर स्काटचे लाकार्टला उद्देशून शेवटचे हे शब्द होते.
 “सद्गुणी हो, धार्मिक रहा आणि चांगला माणूस हो. ठिकाणीं (शेवटचा निजण्याच्या थरावर आलास कीं) दुसऱ्या कोणत्याही गोष्टीनें तुझें समाधान होणार नाहीं.”
 बालामची देखील हीच इच्छा होती, "मला धार्मिक माण-

सांचें मरण येवो व त्याच्या मरणाप्रमाणे माझा अंत होवो.”


१ वर्डस्वर्थ,