पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२४

करा. कारण, "माझ्या हृदयांतील अत्यानंद हेंच तुझ्या कृत्याचें सर्टिफिकेट असें येशू ह्मणाला आहे. "
 फुलर सर अॅन्सिस ड्रेकबद्दल लिहितांना ह्मणतो -"त्याचा आयुष्यक्रम शुद्ध होता, तो देवघेवींत चोख होता, आपला शब्द राखणारा होता; हाताखालच्या लोकांशीं तो दयेनें वागे, व आळसासारखा तो दुसरा कशाचाही द्वेष करीत नसे. मह- त्वाच्या कामांत तो लोकांच्या देखरेखीवर अवलंबून रहात नसे, मग तो कितीही प्रामाणिक व चतुर असो. तो संकटांस तुच्छ मानीत असे, व कोणते श्रम नाकारीत नसे. ज्या प्रसंगीं धैर्य, चातुर्य, व उद्योग इत्यादींचा उपयोग लागे त्या प्रसंगी तो हजर असावयाचाच. "
 आपणांस पूर्ण होतां येणार नाहीं हें आपणांस माहीत आहे, तरी पण सद्वर्तन, व इतर गोष्टींत पूर्णता अंगीं आणण्याचा आपला रोख असावा. आणखी आपल्या देहांत कधीं न फस- णारा वाटाड्या आहे, व सदसद्विवेक बुद्धीप्रमाणें चाललों तर आपण फारसे चुकणार नाहीं. प्रत्येकाला मर्जी असल्यास आपलें आयुष्य उदात्त गोष्टींत घालवितां येईल.
 ह्मणून प्रत्येकानें आपल्या पुढें उत्कृष्ट उदाहरण घ्यावें.
 "मनुष्यानें मनुष्यत्व विसरून वरच्या पायरीस चढण्याचा यत्न केला नाहीं तर मनुष्यप्राणी किती क्षुद्र आहे."
 ह्या रीतीनें व ह्याच रीतीनें तसे होणें शक्य असल्यास तु- झांला असे वळण लावून घेतां येईल कीं, जर तुझी पुरुष असलांत तर सीझरविषयीं मार्क अॅन्टनीकडून शेक्सपीयरनें चदविलें आहे तेंच तुमच्याविषयीं ह्मणतां येईलः -


१ व्हॉगन.