पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२१

ठायीं सहनशीलतेची भावना करितों, पण ही चुकी आहे. सह- नशीलता अंगीं आणण्यास सामर्थ्य हवें, पण मनोविकार चंचल वृत्तीचा व अनियंत्रितपणाचा द्योतक होय.
 तुमची अधिकाराच्या ठिकाणीं नेमणूक झाली असल्यास अ गदीं न्यायानें व नम्रपणे वागा. सादी ह्मणतो – एका पाश्चात्य राजानें एका निरपराधी माणसाला ठार मारण्याचा हुकूम केला. तेव्हां तो ह्मणाला – “राजा तूं स्वतःकडे लक्ष्य दे. मला दुःख होईल पण तुला अखंड डाग लागेल."<br?>  सत्तेबरोबर जबाबदारी येते. पण केव्हांही आपल्यास काय आवडतें ह्याचा विचार करूं नका; आपण काय केले पाहिजे त्याचा विचार करा. हाच सुखाचा खरा मार्ग.
 दोन कर्तव्यांबद्दल संशय असल्यास अगत्याचें तेवढे करा. परधर्मीयांसाठीं कांहीं लोक आपल्या कुटुंबाची हयगय करितात. पण धर्माप्रमाणें भूतदया पहिल्यानें घरांतून सुरू झाली पाहिजे.
 ह्या जगांत सर्व गोष्टी धार्मिकतेकडे धांव घेत आहेत. ह्या- बद्दल आपली खात्री सहज करून घेतां येईल. पापाबद्दल शिक्षा होईल असें आपण बोलत असतों; पण आपणांस कोण शिक्षा करितो? आपणच स्वतःला शिक्षा करून घेतों. जगाची अशी कांहीं रचना केलेली आहे कीं, चांगुलपणा सुखकारक होतो व वाईटपणा दुःखजनक होतो. पाप करावें व त्याबद्दल शिक्षा होऊं नये असें मानणें ह्मणजे सृष्टिनियमांत व्यत्यय आणण्यासारखे आहे. पापाची क्षमा होते ह्मणजे आपणांस शिक्षा होणार नाहीं असा अर्थ नव्हे. तें अशक्य आहे इतकेंच नव्हे, तर तसें झालें, तर एक दुर्दैवच. वस्तुतः वाईट करूनही चलती असणें हें एक दुर्भाग्यच. वाईट केलें तर मागचें स्मरण पुढें तुझांला भूतबाधेप्रमाणे नाडील. ज्यांचें तुझीं नुकसान केलें ते तुझांला क्षमा करितील; पण तसें