पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२०


हें बरें, पण तो कबूल करण्याची लाज वाटू नये. “माणसाला माणुसकी येण्यास, व जें काम करण्यास ईश्वरानें त्यास नेमिलें त्या कामाकरितां स्वतःला योग्य करण्यास, असंख्य गुण लागतात; पण एक गुण अंगी असलाच पाहिजे. त्याशिवाय उत्तम आयुष्यक्रम झालाच नाहीं, त्याशिवाय कोणतेंही मोठें काम करितां येत नाहीं; तो गुण सत्य होय; तें अंतस्थ सत्य होय. खऱ्या चांगल्या व मोठ्या माणसांचीं उदाहरणें घ्या. त्यांना आपण मोठें व चांगलें कां ह्मणतों? कारण ते स्वतःला ओळखण्यास शिकले होते. व जो आयुष्यक्रम त्यांनीं पत्करला तो घेण्याचें त्यांच्यात धैर्य होतें' .”
 "सर्वोत ह्याची विशेष काळजी घ्या - स्वतःशीं सत्यपणें वागा, ह्मणजे, ज्याप्रमाणें दिवस झाल्यावर रात्र येते, त्याप्रमाणें कोणाशीं तुमचें खोटासाळपणाचें वर्तन होणार नाहीं हें आलेंचे.”
 वर्डस्वर्थ ह्मणे - "दोन गोष्टी जरी त्या प्रतियोगिक दिसतात तरी त्या एकत्र असल्या पाहिजेत. त्या ह्या माणुसकीस शोभेल असें इतरांवर अवलंबून रहाणें, व स्वातंत्र्य ह्मणजे इतरांवर भार टाक व स्वतःवर भार टाकणें."
आज्ञा पाळण्यास शिका ह्मणजे सत्ता कशी चालवावी हैं शिकाल. कवाईत ही शरीरास त्याप्रमाणें मनासही वळण लावणारी होय; व वाईट शिपाई कधीं चांगला सेनापती होणार नाहीं.

 “भैरभराट झाली तर गर्वानें तारूं नका. दर्प हा नाशाचा दूत होय, व उद्दाम वृत्ती ही अपयशाच्या पूर्वी येते.” मनोविकाराच्या ठिकाणीं आपण कर्तृत्वाची, व आळसाच्या


१ मॅक्समुलर. २ शेक्सपीयर. ३ प्रॉव्हर्न्स.