पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२२

करितांना तुमच्या डोकीवर आग पाखडल्याप्रमाणे होईल. कारण त्यांच्या औदार्यामुळे तुमचा अपराध अधिक ढोबळ दिसूं लागेल.
 सदाचरण हेच खरें आयुष्य; शेवटीं सुख व भरभराट त्यावर अवलंबून रहातात. बाह्य गोष्टी फारशा महत्वाच्या नसतात. आपण कसे आहोत हें जितकें महत्वाचें तितकी आपली परि- स्थिति महत्वाची नाहीं. तर मग अहर्निश स्वतःवर पहारा ठेवा. संवयी हा एक दुसरा स्वभावच होय. "कार्यरूपी बीज पेरा ह्मणजे संवयरूपी फळें संपादन करितां येतील. संवयरूपी बीज परा, ह्मणजे सदाचाररूपी फळ मिळेल, सदाचार मिळाला ह्मणजे दैव उघडलें.” आपण रोज थोडें थोडें वाढतों. मग जास्त चाईट होतों अथवा जास्त चांगले होतों. रात्रीं, आपण बरें होत चाललों कीं, वाईट होत चाललों, हें तपासून पाहणें चांगलें आहे.
 एमरसन ह्मणतो — “मनुष्यजातीचे दोन भाग पडतात. एक भाग कल्याण करणारे व दुसरा अकल्याण करणारे. तुझी दुसऱ्या भागापैकीं असलांत तर तुझी मित्रांचे शत्रु करितां गत गोष्टींची आठवण क्लेशकारक होते, व आयुष्य दुःखमय वाटू लागतें. जरा कारागारासारखी होते व मृत्यु भयप्रद वाटू लागतो. उलट पक्षीं दुसऱ्याच्या मनांत जरी एक समाधानकारक सुविचार घालून दिलात, किंवा दुसऱ्याच्या आयुष्यांतील एक तास सुखाचा करून दिलात तर तुझीं देवदूताचें काम केलेंत."
 प्रत्येक माणसानें दररोज एक तास-फक्त एकच तास, - निदान अर्धा तास तरी एकांत वासांत मनन करण्यांत व शांततेंत घालवावा. वेळ नाहीं असें ह्मणणे अशक्य आहे. कॉमन्स सर्भेतून परत आल्यावर रात्रीं सर आर पील बायबलचा एक सर्ग वाचित असे. कामन्स सभा त्या वेळीं सध्यासारखी इतका उशीरपावेतों चालत नसे.