पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१७


 नुस्त्या पदवीचा काय उपयोग ? फ्रान्सची राणी मेरी डी मेडिची फ्रान्सची रिजंट, फ्रान्सच्या राजाची, स्पेनच्या राणीची, इंग्लंडच्या राणीची, सेव्हायच्या डचेसची आई, हिला तिच्या पोरांनी सोडिलें, त्यांनी तिला आपल्या राज्यांत येऊ दिलें नाहीं, व शेवटीं दुःखांत, दहा वर्षांचा त्रास सोसून बहुतेक उपासमारानें कलोन येथें ती मेली.
 मुकुट ह्मणजे बहुतेक कांट्यांचेच मुकुट होत. तो मुकुट घालणारा जितका जास्त नेकीचा असतो, तितकी जबाबदारी त्याच्या मनाला जास्त लागत असते. निश्चय करितांना एकादी लहानशी चुकी झाली तर हजारों माणसांना दुःख होईल या विचारांमुळें चिंता वाटल्याशिवाय रहाणें अशक्य आहे.
 सुधारणा होत गेली- मग ती कितीका थोडी असेना - कीं आ- युष्य आल्हादकारक वाहूं लागतें, त्याशिवाय, तें नकोसें होतें. कारण, "कांहीं काल असा असतो कीं, त्या वेळीं गायन, काव्यें, व सृष्टिसौंदर्य इत्यादि गोष्टी आत्मोन्नतीस जी जी मदत करितात त्या मदतीचा उपयोग करून घ्यावा असें सर्वाना वाटतें.”
 माणसाची उन्नति व्हावी असा ईश्वराचा मानस दिसतो, त्यानें तसेंच रहावें असा दिसत नाहीं. कांहीं असो पुष्कळ माण- सांना एकाच स्थळीं तसेंच रहातां येणार नाहीं. पुढें गेलें पाहिजे; नाहीं तर मेलें पाहिजे. तथापि, महत्वाकांक्षा धारण करण्यापूर्वी ज्याप्रमाणे परिणामाविषयीं आपण विशेष काळजी करितों, त्याप्र- माणें साधनांविषयीं काळजी घेतली पाहिजे; दुष्ट साधनांनीं साध्य झालेली बाह्यात्कारी दिसणारी भरभराट खरोखर अपयशा- सारखी आहे. तर मग आपल्या स्वभावास लागणाऱ्या ह्या दोन गोष्टींची कशी मेळ घालावी ? आत्मसंयमन करणें ही आपली महत्वाकांक्षा असली पाहिजे. हाच सर करण्याचा गड
१९