पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१८


होय; व खरी उन्नति ह्मणजे अधिक जाणण्याची, अधिक उच्च

स्थितीस येण्याची, अधिक कर्तव्यकर्मे करण्याची इच्छा होय. ह्या उन्नतीला खळ नको. प्रत्येक पायरीस उन्नतीचा मार्ग दृढ होत जातो; दुर्घट होत नाहीं. आपले कर्तव्य करणें हीच मोठी व पहिली महत्वाकांक्षा माणसास असावी. “कवीचा मान त्याला मिळत नाहीं. कोणत्याही सांप्रदायानें तो बांधला जात नाहीं. स्तुती करणारें मित्रमंडळ त्याची वाहवा करण्यास तयार नसतें. त्याला दूषण देण्यास शत्रूही नसतात. ज्याच्याजवळ मोठासा भपका नाही किंवा सौंदर्य नाहीं, पण ज्याच्या अंगीं प्रामाणिक- पणा आहे, व जो कर्तव्यकर्मास जागृत आहे अशा त्या माणसाला मृत्यु नेतो.”
 वेलिंग्टननें लिहिलेल्या खलित्यांत "मान" हा शब्द मुळींच नाहीं असें ह्मणतात. “कर्तव्यकर्म" हा त्याचा आयुष्यांतला मुख्य हेतु होता. महत्वाकांक्षा न सोडितां साधुसंतांचा आयुष्य- क्रम जो होता तो असूं द्या.
 "इतिहासांतील निष्फळ झालेल्या पानांवर १० हजार राज- कर्ते निपजले तर एक साधू निपजतो, असें दाखवून वृथा अहं कारानें देखील, जें वैभव मिळविण्याची इच्छा तो करित होता, त्या वैभवाला खरा मार्ग लावून दिलाँ."
 शंभर वर्षांनंतर तुझी श्रीमंत होतां किंवा गरीब होतां, सरदार होतां कीं धनगर होतां, ह्याचा काय उपयोग होणार ? पण योग्य तें केलेंत किंवा अयोग्य तें केलेंत ह्याचा बराचसा उपयोग नाहीं का होणार ?

 “आपण काय विचार करितों, आपलें किती ज्ञान आहे, आ-


१ केक. २ बायरन.