पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१६

भक्ष्यस्थानीं पडल्यामुळे त्यांची तृप्ती न होऊन त्यांना ईश्वराचे आभारी होतां आलें नाहीं. बेकन ह्मणतो – “ज्या माणसाला पुढे पुढे जाण्याची संवय आहे त्याला जर अडथळा आला तर तो स्वतःशींच रुष्ट होतो, व तो निराळाच माणूस बनतो."
 तरी पण पोपसारखें ह्मणणें फारच झालें.
 वैभवयुक्त आयुष्याचा कार्यभारानें व्याप्त असा एक तास वैभवरहित संबंध आयुष्याबरोबर आहे.
 स्वार्थपर महत्वाकांक्षा ही वेताळाच्या स्वारीसारखी आहे. ती फसविणाऱ्या प्रकाशाप्रमाणें होय.
 " महत्वाकांक्षा ही मोठी फसवी होय. ती बुद्धिमान् त - रुणांच्या खोलींत शोधित जाते. त्यांची खिडकी उघडते व आंत शिरते. खोलीच्या अरुंद भिंती मोठ्या होतात व त्यांचा विस्तीर्ण राजवाडा होतो. त्याचें छप्पर आकाशापर्यंत जातें. अदृश्य हा- तांनीं छतावर सोनेरी नक्शी तयार होते व सर्व वस्तूंवर सोनेरी अक्षरांनी त्यांचें नांव पडतें x x x x x आणि ह्या सर्वांचा फायदा काय ? फार झाले तर मोठें नांव मिळतें. त्याची प्र- शंसा होते-पण असा वेळ येईपर्यंत कर्ण ह्यातारपणामुळे बधिर झालेले असतात. पैसा मिळतो-पण त्याच्या योगानें ज्या इंद्रियांस सुख व्हावयाचें तीं क्षीण होतात. पुष्पमाला मिळतात- ज्या केशांवर ती माला घालावयाची ते केश पांढरे झालेले अस- तात. मोठें नांव मिळतें- ज्या हृदयाला त्यापासून आनंद व्हाव- याचा तें हृदय कठिण होतें. त्या वेळीं प्रीतीशिवाय सर्व कांहीं मिळतें; व प्रीति मात्र हवी असते. इतक्यांत मृत्यु येतो व ह्या निरुपयोगी वस्तु आपल्या आहेत असें वाटायाला लागण्यापूर्वीच तो आपणास नंगाच मसणांत नेतो'."


१ वुइलिस,