पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१५

रांत तो टाक, अथवा एकादें लहान पोराचें खेळणें घे, असे सांग- तांना ऐकिलें तर आपणांस किती आश्चर्य वाटेल. मग जें काम दुसन्यास करावयास सांगितलें असतां आपणांस हंसतील तें काम आपण कां करावें ? "
 श्रेष्ठतर गोष्टींकडे लक्ष द्या. आपल्या खालच्या पायरीकडे पाहूं नका. बेकन्सफील्ड ह्मणे — “ जो मनुष्य वर पहात नाहीं त्याला खालीं पाहिले पाहिजे. जो आत्मा वर चढण्यास धजत नाहीं त्याला खालींच रखडत राहिले पाहिजे. "
 " जोपर्यंत त्या शब्दांत मोहिनी आहे, जोपर्यंत त्याच्या योगानें अंग फुरफुरावयाला लागतें, हृदय वीरश्रीनें धडधडूं लागतें, जुने जे वीर त्यांच्या बद्दल विचार मनांत आल्याबरोबर तरुण बांड आळसावून पडलेल्या बिछान्यावरून ताडकन् उठतात व हात वर करून त्यांच्यासारखें वीरश्रीनें काम करूं अशी शपथ वहातात; तोपर्यंत मोठें नांव हा वायफळ शब्द आहे असे विचार केल्याशिवाय कोण ह्मणेले ? "
 मनुष्यदेहाचा सारासारविचार केला तर, महत्वाकांक्षा ज्या स्वरूपानें दृष्टीस पडते त्याचा विचार करण्याचें प्रयोजन दिसत नाहीं. खरोखर आपलीं मोठालीं माणसें शेक्सपीयर, मिल्टन, न्यूटन, आणि डार्विन ह्यांना, सरकार ज्या पदव्या देतें, त्या पद- व्यांचा किंवा मोठ्या मानांचा कधीं उपयोग झाला नाहीं. साधा- रण महत्वाकांक्षेचें व्यंग असे आहे कीं, तिची तृप्ती होत नाहीं. ज्याप्रमाणें पर्वत चढतांना एका शिखरावर चढलों ह्मणजे दुसरें शिखर वर दिसतें. उदाहरणार्थ, सर्वांत मोठे जेते अलेक्झॅन्डर, नेपोलियन इ० हे कधीं तृप्त झाले नाहींत. भलत्याच महत्वाकांक्षेच्या


१ जोआना बेली.