पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१४

जरी खरोखरी थोडे निर्बुद्ध असलांत व गोष्टी चटकन कळत नसल्या, तरी त्याबद्दल देखील तुझीं काळजी घेतली पाहिजे. त्याची हयगय करूं नये किंवा आपण निर्बुद्ध आहोत ह्यांत संतुष्ट असूं नये. "
 ज्याबद्दल तुह्मांला लाज वाटायला कारण राहील असें कांहीं- ही करूं नका. एक चांगले मत तुझांला फार महत्वाचें आहे, तें कोणतें ह्मणाल तर तुमचें स्वतःचें. सेनिका ह्मणतो - "मन शुद्ध असणें ही एक नेहमींची मेजवानी होय.
 कलीनें बऱ्याच उपदेशपर गोष्टी सांगितल्या आहेत. त्या- बद्दल आपण त्याचे ऋणी आहोंत. पण त्यानें सांगितलेली एक मसलत बरी ह्मणतां येत नाहीं. सद्गुणांचा थोडक्यांत स्पष्ट तपशील दिल्यावर तो ह्मणतो–“ हे सद्गुण अंगवळणीस पाड- ण्याचा माझा बेत असल्यामुळे, ते सद्गुण एकदम मिळविण्याच्या भरीस पडून मन शतधा करूं नये, पण एकेका गुणावर पूर्ण लक्ष द्यावें, व एका गुणावर पूर्ण सत्ता मिळविल्यावर दुसरा गुण घ्यावा व ह्याप्रमाणें तेराही गुण अंगीं आणावे, हें बरें असें मीं ठरविलें.” ( नेमस्तपणा, मौन, व्यवस्थितपणा, निश्चय, काटकसर, उद्योग, निष्कपटीपणा, न्याय, मिताहार, स्वच्छता, शांतता, शुद्धता व नम्रता )
 ह्या सिद्धांताप्रमाणें तो खरोखर वागला असेल असे मानणें कठीण आहे. कारण “जर सैतानाचा एक नातलग आपल्या घरी आणलात तर बाकीची माणसें यावयाचींच. "
 बिशप विल्सन ह्मणतो “एकाद्या गरीब माणसाला एकाद्यानें पैसा देतांना व त्याला पिठ्यांत जा व तेथें उडीव, किंवा जुगा-


१ मार्कस आरिलीअस.