पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१३

 आयुष्यांत खर यश मिळविण्यास काय काय जरूर आहे ? “ फक्त एकच गोष्ट हवी. पैसा नको; सत्ता नको; हुशारी नको; मोठें नांव नको; स्वातंत्र्य नको; आरोग्य हवेंच असें नव्हे; फक्त शुद्ध आचरण, चांगली संस्कृत झालेली इच्छा, हीच खरोखरी आपला बचाव करील; व ह्या अर्थानें आपलें संरक्षण झाले नाहीं तर आपण खरोखरी पापी'. "
 तुझी जें आपलें आचरण ठरवाल तें तुझांला करितां येईल. सर्वांना कवि किंवा गवई, मोठाले कारागीर, अथवा शास्त्रज्ञ होतां येणार नाहीं.
 " स्वभावतः ह्या कामाकरितां आह्मी योग्य नाहीं असें ज्या गोष्टींबद्दल आपणांला ह्मणतां येणार नाहीं अशा पुष्कळ गोष्टी आहेत. तर जे गुण तुमच्या अगदी हातांतले आहेत ते तरी दाखवा. निष्कपटीपणा, गांभीर्य, मेहनत, सोसूकपणा, चैनबाजीचा तिटकारा, औदार्य, स्पष्टवक्तेपणा, उधळपट्टीच्या ठायीं अनादर, धरसोडपणाचा त्याग, मनाचा मोठेपणा हे तरी गुण दाखवा. किती गुण तुझांला लगेंच दाखवितां येतील असें तुझांला वाटत नाहीं का ? ह्या ठिकाणीं स्वाभाविक अयोग्यता किंवा बुद्धीची कमतरता ह्यांची सबब नको. तरी तूं आपण होऊन बुद्धिसाम- र्थ्याच्या योग्य वाढीस येत नाहींस. सृष्टीनें कमी बुद्धि दिली ह्मणून कुरकुर करणें, नीचपणा करणें, हांजी हांजी करणें, आ- पल्या शरीराला दूषणें देत बसणें, लोकांना खुष करण्याचा यत्न करणें, उगाच अवडंबर करणें, मन अस्वस्थ ठेवणें इत्यादि गोष्टी करणें तुह्मांला जरूर आहे काय ? ईश्वरसाक्ष अशी जरूरी नाहीं; पण ह्या गोष्टींतून तुह्मी केव्हांच पार पडला असतां. तुह्मी


१ ब्ल्यॅकी.