पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग. १७


सद्वर्तन.

 ह्या जगांत यश मिळविण्याचा प्रश्न असला तर सद्वर्तन व स्थैर्य ह्यांचा नुस्त्या हुशारीपेक्षा जास्त उपयोग होतो. आचरणाचें महत्व मुख्यत्वेंकरून मी ह्या कारणावरून ठरवीत नाहीं, तरी तें खरें आहेच. सत्यानें वागणें हें, सत्यानें कसे वागावें, हें सम- जण्यापेक्षां जास्त महत्वाचें आहे. चांगले होण्याची इच्छा असो, अथवा भरभराटीस येण्याची किंवा सुखी होण्याची इच्छा असो आपण त्याच मार्गानें जावें. सोनेरी अक्षरानें लिहिण्याचीं कृत्यें केलीं ह्मणजे सोन्याचे दिवस येतात.
 आयुष्याची किंमत नैतिक किंमतीवरून ठरवावयाची. "काय करावयाचें तें सदसद्विवेकबुद्धीनें ठरविल्यावर कांकूं करीत किंवा वाट पहात रहावयाचें नाहीं असा निश्चय करा; म्हणजे पापी माणसांना वास्तविकपणें जें सुख मिळण्याची आशा असते त्या सुखभांडाराची किल्ली तुझांला मिळालीचे. "
 सारांश घेतल्यास कर्तव्यकर्माची टाळाटाळी करून किंवा हयगय करून तुमचें सुख कधीं वाढणार नाहीं. चांगल्या माणसांची व त्याचप्रमाणें शहाण्या माणसांची एकच खूण असते.
 “ भेकडपणा तो मुळींच मनांत आणित नाहीं. ज्या ठिकाणीं कर्तव्यकर्म नेतें त्या ठिकाणीं बिनधास्त तो जातो. कर्तव्यकर्मा- साठीं हजारों संकटांना तोंड देतो, व ईश्वरावर हवाला ठेऊन

त्या सर्वांचा प्रतिकार करितो. "


 १ केबल. २ वर्डस्वर्थ.