पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२११

 “क्षमाशील माणसास फार खस खावी लागते. पण त्याच्या अंगीं माया असते. तो कोणाचा हेवा करीत नाहीं, फुशारक्या मारीत नाहीं, किंवा गर्वानें फुरफुरत नाहीं; अशिष्ट असें वर्त करीत नाहीं; आपलीच तुंबडी भरण्याचा यत्न करीत नाहीं; क्षुल्लक कारणावरून चिरडीस जात नाहीं; कोणाचें वाईट इच्छित नाहीं; त्यास अन्यायापासून आनंद होत नाहीं; सत्यांत आनंद वाटतो, तो सर्व सोसतो, सर्व गोष्टींत विश्वास ठेवतो; सर्व गोष्टीं- बद्दल आशा करितो; सर्व गोष्टी सहन करितो.”
 “क्षमाशीलता कधीं नाहींशी होत नाहीं. भविष्य चुकेल, वाणी बसेल, ज्ञान नष्ट होईल, फक्त धर्मबुद्धि, आशा, क्षमाशीलता ह्या तीन गोष्टी राहतील, ह्या त्रिकुटांत क्षमाशीलता मोठी. "


१ सेट मॅथ्यू.