पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१०


बनलों, इतरांबद्दल क्षमाबुद्धि बाळगली नाहीं, असा हा

विचार मनांत आल्यावर देवाचा काय ठराव होईल ह्या- बद्दल जी भीति उत्पन्न होते त्यापेक्षा जास्त भीति दुसऱ्या कोण- त्याही गोष्टींनीं उत्पन्न होईल काय ? आणि ही क्षमावृत्तिच तुमच्या उपयोगीं पडेल; व ती तुमच्या काम पडावी असें तुझांला वाटतें ही. अशी स्वाभाविक भीति बाळगण्यास, आमच्या तारकानें लावून दाखविलेल्या कल्पित गोष्टीचा आधार आहे.
 जर आपले रक्तमांसाच्या बंधुजनांचे अपराध मनापासून तुझी विसरत नाहींत, तर तुमचा आकाशांतील बापही ह्याच- प्रमाणें तुमच्याशीं वर्तन करील.
 अपराध विसरून आपल्या शत्रूंवर प्रीति करावी अशी जी ईश्वरी आज्ञा ती जरी इतर धर्मात नाहीं असें नाहीं, तरी ती मुख्यत्वें करून ख्रिस्ती धर्मातलीच होय. बायबल ती आज्ञा पुनः पुनः सांगतें. जर " तुझी माणसांचे अपराध क्षमा कराल तर आकाशांतील प्रभु तुह्मांस क्षमा करील; परंतु तुझी जर क्षमा करीत नाहीं, तर तुमचा प्रभुही तुह्मांला क्षमा करणार नाहीं. "
 नुसती क्षमा पुरी नाहीं. आपणांस आणखी विशेष केलें पा- हिजेः-“मी तुझांला सांगतों आपल्या दुष्मनांवर प्रीति करा; जे तुह्मांला शाप देतात त्यांना तुह्मी आशीर्वाद द्या; जे तुमचा द्वेष करितात त्यांचें चांगलें करा; जे तुमचा तिरस्कार करितात आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठीं देवाजवळ प्रार्थ- ना करा; ह्मणजे आकाशांतील बापाचीं तुझी खरीं लेंकरें व्हाल. कारण, बऱ्यावाईट सर्व प्रकारच्या माणसांसाठीं देव सूर्यास प्रकाशावयास लावितो, व न्यायी व अन्यायी दोन्ही लोकांसाठीं पाऊस पाडितो."
 सेंट पॉल ह्मणतो-