पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०९

करितात. आणि तेंही खरें आहे ह्यांत काय संशय ? कांहीं प्रसिद्ध ग्रीक ओळी अशा अर्थाच्या आहेतः :–" अतिथि, व गरीब लोक हे झ्यूसचे आश्रित होत; आणि दानधर्म अगदर्दी थोडा केला तरी तो देवाला गोड आहे. "
 परंतु धर्म करणे हा चॅरिटीचा फक्त एकच भाग होय; व तो मुख्य भागही नव्हे. नीट रीतीनें जर धर्म केला नाहीं, तर त्यापासून बरें होण्याचा ऐवजीं नुकसानच होतें. कळवळा व ममता ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या होत.
 " दुसऱ्यांचे दुःखाची सहानुभूति होण्यास मला शिकवा; जीं व्यंगें मला दिसतात तिकडे काणाडोळा करण्यास मला शिकवा; व जी दया मी इतरांस दाखवितों ती दया मजवर करो. ”
 इतरांनीं दिलेला त्रास विसरा, पण केलेला उपकार विसरूं नका;२०९ कृतघ्न मुलगा असणें हें सर्पाच्या दांतापेक्षा अधिक टोंचणारे वाटतें. "
 "दिवसाचा प्रकाश पहाण्यास अयोग्य असले लोक किती असतात ? तरी सूर्य उगवतोचें. "
 जे इतरांस क्षमा करीत नाहींत त्यांना आपणांस इतरांनीं क्षमा करावी असे वाटू नये. "आतां मरण येणार अशी भीति नेहमी बाळगा. त्याचप्रमाणें आज, नग्न, सोंगेंढोंगें एकीकडे सारून पृथ्वीचा जो शास्ता त्याच्या समोर आपल्या बंधुजनां- बरोबर जें बरेंवाईट वर्तन केलें असेल त्याबद्दल जाब देण्यास उभे आहोत असे समजा. ज्यांनीं आपलें नुकसान केलें त्यांच्यावर मुळींच दया केली नाहीं, व आपण पाषाणहृदयी


१ इंद्रदेव. २ पोप. ३ शेक्सपीयर ४ सेनिका.