पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०८

सोयींकडे लक्ष्य द्यावें हें निश्चित आहे. जरूर नाहीं असे दुःख त्यांना देणें ह्मणजे गुन्हा होय.
 “ चांगल्या माणसांच्या आयुष्यांतील उत्तम भाग ह्मणजे लहानसहान जीं सांगतां येत नाहींत व ज्यांचें स्मरण रहात नाहीं अशीं ममतेचीं व दयेचीं कृत्यें होत" असें वर्डस्वर्थ ह्मणतो. आणि कॉलेरिज ह्मणतो तेंही खरें आहे:-
 "मनुष्यमात्रांवर व पशुपक्ष्यांवर जे लोक प्रीति करितात तेच खरी प्रार्थना करितात."
 “ज्या देवानें सर्व वस्तु उत्पन्न केल्या आणि जो त्यांवर प्रीति करितो व आपणांवर प्रीति करितो, त्याच्याकरितां लहान मोठ्या सर्व वस्तूंवर जो माणूस प्रीति करितो तोच ईश्वराची खरी प्रार्थ- ना करितो. "
 शेक्सपीयरच्या ग्रंथांतून जे उत्तम भाग आले आहेत त्या सर्वोत दयेचें जें वर्णन केलें आहे त्यापेक्षां श्रेष्ठतम दुसरा भाग नाहीं.
 " दया हा गुण ओढून ताणून येत नाहीं. ह्या जगावर आकाशांतल्या पर्जन्यधारेप्रमाणें ती हळू हळू पडते. तीपासून दोघांनाही सुख आहे. जो दया करितो व ज्या माणसावर दया होते ते दोघेही सुखी. ती बलवंतांत बलवती आहे. सिंहासनस्थ राजाला त्याच्या मुकुटापेक्षां ती जास्त शोभा आणिते. राजाचा राजदंड ह्मणजे ऐहिक सत्ता दर्शविणारें चिन्ह होय. राजतेज व भीति दर्शविणारा तो; व त्यावर राजाबद्दलची भीति अवलं- बून असणार. पण दया ही ह्या राजदंडानें प्रदर्शित केलेल्या सत्ते- च्या बाहेर आहे. ती राजांच्या हृत्पटलांवर खोदलेली आहे. दया ईश्वराला साजणारा एक गुण होय. न्यायदेवता जेव्हां दयेनें भूषित होते तेव्हां ऐहिक सत्ता ईश्वरी सत्तेप्रमाणें वाटू लागते. " चॅरिटी ह्या शब्दाचा अर्थ लोक वारंवार दानधर्म करणें असा