पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०७

ह्मणतो-गळ, फांस, जाळीं, कुत्रे ( बंदुका असें आतां आणखी मटले पाहिजे ) इत्यादि घेऊन आपण सर्व सजीव प्राण्यांबरोबर युद्ध मांडितों. इतर कांहीं प्राण्यांना मारून आपलें जीवन करावें हें माणसास साधारणपणें जरूर आहेसे वाटतें. जर त्यांचे आपण इतके ऋणी आहोंत तर त्यांना उगाच त्रास न देण्यास जास्तच जपलें पाहिजे.
 “ दुःखादि विकारांची लायकी ज्यांस आहे अशा क्षुद्र जंतूंस देखील दुःख होईल, असल्या गोष्टींत आपणांस आनंद नसावा व गर्वही नसावी. "
 आणि अतएव " तुझें अंतःकरण जर सदय असले, तर प्रत्येक जंतु आयुष्यसंस्कारदर्शक आरशाप्रमाणे, व पवित्र ईश्वरी कायद्याच्या ग्रंथांप्रमाणे वाटेले. " प्राण्यांना आत्मा नाहीं असें आजकाल आपण बहुतेक मानितों; पण बुद्धापासून वेस्ली व किंग्स्लीपर्यंत बहुतेक जास्त लोक त्यांना आत्मा आहे असें मानीत आले.
 निदान पक्ष्यांमध्यें तरी विशेष स्वर्गिक गुण दिसतात. सेंट फ्रांसिसला आपण देव आहोंत अशी खात्री होती. त्याला वाटे कीं पक्षी देखील त्याप्रमाणें दैविक असतील, त्यांना आपल्या सा- रखा नश्वर देह मात्र प्राप्त झाला असेल. इतक्या आश्चर्यका- रक व सुंदर प्राण्याचे आह्मी नातलग आहोत असें ममतेनें ह्मण- ण्यांत मनुष्यत्वाला काळिमा येणार नाहीं असें त्याला वाटे. त्याच्या जुन्या समजुतीप्रमाणें पक्षी आकाशांतील देवदूतां- प्रमाणें अरण्यांतून ईश्वराची स्तुती करीत फिरत असतात.
 तें काहीं असो पण, प्राण्यांना ममतेनें वागवावें व त्यांच्या


१ वर्डस्वर्थ २ टामस ए केंपीस.