पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०६


 आपली नाखुषी दाखविणें जरूर आहे अशीं प्रयोजनें असा- वींत व असतीलच. परंतु साधारण नियम हा असावा कीं, ज्या ठिकाणीं ममतेनें किंवा गय करून बोलतां येत नाहीं, त्याठिकाणी मुळींच बोलूं नये ते चांगलें. एक ओळखीचा मनुष्य सिडनी स्मिथला त्याच्या पश्चात् शिव्या देत असे; त्याला त्यानें असा निरोप पाठविला कीं, माझ्या मार्गे तूं मला लाथा मारल्यास तरी चालतील. तथापि आपल्या समक्ष आपले अपराध दाखवावे असे बहुतेकांस वाटतें, व आपले संरक्षण करण्यास हजर नसतां, जें आपल्याविषयीं लोक ह्मणतात त्याबद्दल त्यांना विशेष चीड असते. इतरांबद्दल वाईट साईट अफवा सांगितलेल्या ऐकून लोक हंसोत, व त्यांची करमणूक होवो, परंतु त्यांचें जें स्वाभा- विक अनुमान कीं, पुढे मागें आपल्यावरही असा प्रसंग यावया- चा तें ते काढतीलच, ही खात्री ठेवा; जरी लोक तुमच्या बरो- बर हंसले तरी तुझी त्यांना फारसे आवडणार नाहींत.
 “तर मग आपले बंधु जे मानव त्यांच्यावर सौम्यपणें टीका करा, व विशेषेकरून आपल्या भगिनी ज्या बाया त्यांवर." जरी माणसें जाणून बुजून अपराध करीत असली तरी त्यांच्याकडे काणाडोळा करणे चांगलें.
 “बरा कोण वाईट कोण हें जोखून ठरवितांना आपण चुप असावें हें चांगलें; कारण तराजू बरोबर लावतां येणें कठीण आहे. माणसानें जें वाईट केलें त्याचा साधारण अदमास करितां येईल, पण ज्या मोहांचा त्यांनी प्रतिकार केला ते आपणांस कळत नाहींत. "

 प्राण्यांबद्दलही दोन शब्द येथें लिहिले पाहिजेत. सेनिका


१ बर्न्स.