पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०५


 कोणी आजारी आहे असें कळतांच आपण किती ममता दाखवितों. कांहीं देण्यास पुढें मार्गे पहात नाहीं; जें जें करावेंसें वाटतें तें तें करितों; त्रास किंवा दगदग जेवढी नाहींशी होईल तेवढी करितों; पण आपण त्याच वेळीं असें कां करितों ? नेहमीं जर इतक्या ममतेनें व दयार्द्र बुद्धीनें वागलों तर किती बरे होईल ?
 लोकांना चिंता, काळजी, दुःखाचें ओझें व गुप्त संकटें काय काय असतात हें आपणांस माहीत नसतें; तर मग कुरकुर कर- ण्यास जागा असली तरी गय करा. पुष्कळ वेळां गय करावी लागेल असें मानायला नको. जी गोष्ट येईल ती बरी माना व जो मनुष्य भेटेल त्याशीं चांगल्या रीतीनें वागा.
 मेल्या माणसांविषयी वाईट बोलू नये ही उक्ति चांगली आहे पण ती मेलेल्यांनाच कां लागावी ? एकाद्या माणसाविषयीं एक गोड शब्द किंवा एक चांगलें कृत्य ऐकलें, तर त्याविषयीं हजार दुष्ट अफवा व वाईट साईट टीका कानावर पडते; असें कां ? मेल्या माणसांविषयीं ज्याप्रमाणे पूज्य बुद्धीनें लोक बोलतात, त्याप्रमाणे जिवंत माणसांविषयीं कां बोलूं नये ?

 लोकांवर दोषारोप करावयाचाच असल्यास घाईनें तरी तो करूं नका. व “ कोणत्याही माणसावर दोषारोप करूं नका. त्याच्या डोक्यांतील विचार आणि त्याचें मन तुला दिसत नाहीं. जो तुझ्या अंध डोळ्याला डागसा वाटतो, तो ईश्वराच्या दिव्य चक्षूंस ज्या लढाईत तुह्मी भ्यालां असतां व हार गेलां असतां, अशा मोठ्या बहादुरीनें मारलेल्या लढाईत मिळालेल्या जखमेचा व्रण वाटेल.


१ प्रॉक्टर. १८